‘अक्षयवर 500 कोटी लावतील पण माझ्यावर…..’, ‘या’ अभिनेत्यानं दिली चुकांची कबुली

मुंबई| अभिनेता सुनील शेट्टी गेल्या 30 वर्षांपासून बॉलिवूडचा भाग आहे. सुनीलने त्याच्या आयुष्यात मोठ्या संकटांचा सामना केला. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली पण त्याच्या काही चित्रपटांना तुफान यश मिळालं तर काही चित्रपटांना मात्र अपयशाचा सामना करावा लागला.

अभिनेता सुनील शेट्टीने 1992 सालच्या ‘बलवान’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने ‘काटे’, ‘सपूत’ आणि ‘हेरा फेरी’ चित्रपटातून स्वतःची ओळख निर्माण केली. याशिवाय ‘धडकन’ चित्रपटातून नकारात्मक भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांची मन जिंकली.

इतकं करूनही सुनील अक्षय कुमार, सलमान खान आणि अजय देवगन यांच्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर राज्य करू शकला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीलने त्याने केलेल्या चुका मान्य केल्या ज्यामुळे त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली.

सुनीलने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, ‘एक काळ असा होता, जेव्हा करियरमध्ये अपयश  वाट्याला येवू लागलं. त्या सुनील शेट्टीने विषयावर विश्वास दाखवला, पण मार्केटींगमध्ये मात्र फेल झाला.’ मार्केटींग मुळे सुनिलच्या वाट्याला अपयश आलं असं म्हणायला हरकत नाही.  आता लवकरच सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

सुनील म्हणला, ‘माझ्या मुलाला देखील बॉलिवूडचा एक भाग बनवण्याची माझी इच्छा आहे. तो बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी तयार देखील झाला आहे.’ तर सुनील शेट्टीच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. अथियाने 2015 बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केलं. ती ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही दिसली.

सुनील म्हणाला, मी नेहमीच पडद्यावर एक नॉन- रोमॅन्टिक अभिनेता राहिलो. माझी अडचण ही नाही की मी एकाच प्रकारचे चित्रपट करत राहिलो. मी नेहमी सेफमध्ये राहण्याचा प्रयत्न केला. मी कधीही वेगळे चित्रपट करण्याच्या प्रयत्न केला नाही. तुम्ही जर एकाच बॅनरसोबत काम करत राहिलात तर त्याचा अर्थ होतो की तुमच्यात निर्णय घ्यायची क्षमता नाही. जर तुम्ही रिस्क घेत नाही तर तुम्ही अभिनेता नाही. तुम्हाला स्वतःची वेगळी स्टाइल बनवावी लागते.

टायगर आणि आयुष्मान हे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी रिस्क घेण्याची धमक दाखवली. आज कोणताच निर्माता सुनील शेट्टीवर 50 कोटी रुपये लावणार नाही पण अक्षय कुमारवर 500 कोटीसुद्धा लावायला सगळे तयार आहेत.

एक ना अनेक चुका करिअरमध्ये मला घातक ठरल्या. अर्थात आज पश्चाताप नाही. कारण या चुकांमधून मी खूप काही शिकलोय. कदाचित मी जे काही शिकलो ते माझ्या मुलाला त्याच्या करिअरमध्ये उपयोगी पडेल, असेही सुनील शेट्टीनं सांगितले.

महत्वाच्या बातम्या – 

‘पैसा आणि ओळख यांना कोरोना ओळखत नाही’ फुलवा…

‘महासत्ता होणार म्हणे…महाथट्टा नक्कीच झालीय’…

वेंटिलेटरवर असणाऱ्या रूग्णाने असं काही केलंं की व्हिडीओ…

जाणून घ्या! कोरोना काळात ‘या’ पेयांचे सेवन…

आता18 वर्षे पूर्ण वयाच्या लोकांना घेता येणार लस, रजिस्ट्रेशन…