चिमुकल्याच्या हुशारीमुळे वाचला आईचा जीव, आई बेशुद्ध झाल्यावर केलं असं काही की…

गांधीनगर | दररोजच्या धगधगत्या जीवनात मोठी संकटं उभी राहतात. अनेकदा या संकटांना कसं पार करायचं हे सुचत देखील नाही. घरातील निर्णय घेणारी मोठी माणसं देखील कधी कधी निर्णय योग्य की अयोग्य ठरवू शकत नाहीत.

लहान मुलांवर देखील घरातील आचारविचारांचा, शाळेत शिकवणाऱ्या गोष्टींचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे वाढत्या वयानुसार मुलं समजूतदार देखील होतात. अशातच लहान मुलांना आपात्कालिन सेवेची माहिती देणं फायदेशीर ठरू शकतं.

असाच एक प्रकार गुजरातच्या गांधीनगरमध्ये घडला आहे. एका लहान मुलाने संकटाच्या क्षणी समजुतदारपणा दाखवल्यानं त्याला आपल्या आईचे प्राण वाचता आले आहेत.

उत्तर प्रदेशातील अयोध्याची 40 वर्षीय मंजू पांडे नावाची महिला गेल्या अनेक वर्षापासून गुजरातमध्ये राहत आहे. सध्या ती आपल्या कुटुंबासह संजय नगरमध्ये राहते.

मंजूला बुधवारी अचानक पोटात दुखू लागलं. काही वेळात तिला उलट्या देखील सुरू झाल्या. त्यानंतर काही वेळात ती बेशुद्ध होऊन खाली पडली. हा सर्व प्रकार 7 वर्षाचा मुलगा राहुल पाहत होता.

राहुलने आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आई बेशुद्ध पडल्यावर त्याने कसलाही वेळ न घालवता अॅब्युलन्सला फोन केला. राहुलने तातडीने 108 नंबरवर फोन फिरवला.

अॅब्युलन्स वेळेवर पोहचली आणि राहुलच्या आईला रूग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर डाॅक्टरांनी वेळेवर इलाज केल्यानं राहुलच्या आईचे प्राण वाचू शकले.

जर 1 तास जरी उशीर झाला असता तर महिलेचा जीव जावू शकला असता, असं संबंधित डाॅक्टरांनी सांगितलं आणि वेळेवर फोन करणाऱ्या राहुलचं कौतुक देखील डाॅक्टरांनी केलं.

एकदा माझ्या बहिणीने सांगितलं होतं की, कोणाचीही तब्येत बिघडली तर 108 नंबरवर फोन कर लगेचच अॅब्युलन्स बोलावता येते, असं राहुल म्हणाला. आपल्या मोठ्या बहिणीचा सल्ला राहुलच्या उपयोगी पडला.

दरम्यान, हुशारीमुळे आईचा जीव वाचवल्यामुळे आता राहुलचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. राहुलने आईसाठी केलेले प्रयत्न ऐकल्यावर आईला देखील आनंदअश्रू थांबवता आले नाहीत.

महत्वाच्या बातम्या – 

बापरे! राज्यात कोरोनाचा धुमाकूळ, गेल्या 24 तासात रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ

मुंबईत लाॅकडाऊनची शक्यता! कोरोना रूग्णसंख्येनं ठरलेला ‘तो’ आकडा ओलांडला

राज ठाकरेंना अटक होणार?, समोर आलं ‘हे’ मोठं कारण…

“चंद्रकांत पाटलांचं संतुलन ढासळलंय, त्यांच्या तोंडात किती…”

संजय राऊत म्हणतात,”चंद्रकांत पाटलांनी मला चहा पाजायला हवा, मी त्यांना…”