बापरे! राज्यात कोरोनाचा धुमाकूळ, गेल्या 24 तासात रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ

मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं दिसत आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

अशातच आता मागील काही दिवसांपासून राज्याच्या आकडेवारीत अचानक वाढ झाल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्याने आता आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. आज तब्बल 36 हजार 265 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,907 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

5 जानेवारी रोजी राज्यातील नवीन रूग्णसंख्या 26 हजार 538 होती आता नवी रुग्णसंख्या 36 हजारावर गेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता देखील वाढली आहे.

राज्यात आज 79 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 876 ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता ओमिक्राॅन देखील झपाट्याने वाढत असल्याचं दिसतंय.

गेल्या 2 दिवसांमध्ये राज्यातील नवीन रूग्णसंख्या ही दुप्पट झाल्याचं पहायला मिळतंय. तर राजधानी मुंबईमध्ये देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत 20 हजार 181 नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे आता मुंबईत लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या – 

मुंबईत लाॅकडाऊनची शक्यता! कोरोना रूग्णसंख्येनं ठरलेला ‘तो’ आकडा ओलांडला

राज ठाकरेंना अटक होणार?, समोर आलं ‘हे’ मोठं कारण…

“चंद्रकांत पाटलांचं संतुलन ढासळलंय, त्यांच्या तोंडात किती…”

संजय राऊत म्हणतात,”चंद्रकांत पाटलांनी मला चहा पाजायला हवा, मी त्यांना…”

Omicronची लक्षणं किती काळ राहतात?, स्वतःची टेस्ट कधी करावी?; वाचा सविस्तर