पुण्यात रस्त्यावर पचकन थुंकला… अशी कारवाई झाली की त्याला चांगलीच अद्दल घडली!

पुणे | कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सध्या अनेक गोष्टींवर निर्बंध आणले गेले आहेत. मात्र तरीही काही बहाद्दर नियम तोडून राजरोसपणे फिरताना दिसत आहेत. पुण्यात अशाच एका नियम मोडणाऱ्या थुंकी बहाद्दरावर पुणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याने संबंधित रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीला शर्ट काढून थुंकी साफ करायला लावली. महापालिकेच्या या कारवाईमुळे त्याला चांगलीच अद्दल घडली. तसंच इतरही आजूबाजूच्या नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनाही कारवाईचं महत्व पटलं.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. त्यासोबतच सार्वजनिक जागी थुंकणाऱ्यांवर कारवाई करुन 6 महिने जेल होणार असल्याचा इशारा देखील सरकारने दिला आहे. तरी देखील काही व्यक्तींना गांभीर्य येत नाहीये.

दरम्यान, इथून पुढे आता थुंकणाऱ्या नागरिकांची गय केली जाणार नाही. शासन-प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळणं जर शक्य होत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय त्यांना अद्दल घडणार नाही, अशी आक्रमक भूमिका महापालिकेने घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दिलासादायक! गेल्या 48 तासांत एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नाही

-झुंज अपयशी… राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी!

-कोरोनामुळे पहिल्यांदाच आमदाराचा बळी; वाढदिवसालाच ‘या’ आमदाराचा मृत्यू!

-उद्धव आणि आदित्य यांचा मला पाठिंबा, म्हणाले कसलीही मदत करायला तयार आहे- सोनू सूद

-“शिवसेना ही बाळासाहेबांचीच… पण भाजप आता वाजपेयी-अडवाणींचा राहिलाय का?”