दिलासादायक! गेल्या 48 तासांत एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नाही

मुंबई | कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात पोलीस अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. लोकांनी घरात थांबावं यासाठी आपला जीव धोक्यात घालून  बंदोबस्त करणाऱ्या पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. तसेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

गेल्या 48 तासात एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असताना ही बातमी पोलीस खात्याला आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी आहे.

गेल्या 48 तासात एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली नाही. आतापर्यंत 2562 पोलिसांना कोरोनाची लागण झालेली असून 34 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात 2259 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 90 हजार 787 झाली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-झुंज अपयशी… राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी!

-कोरोनामुळे पहिल्यांदाच आमदाराचा बळी; वाढदिवसालाच ‘या’ आमदाराचा मृत्यू!

-उद्धव आणि आदित्य यांचा मला पाठिंबा, म्हणाले कसलीही मदत करायला तयार आहे- सोनू सूद

-“शिवसेना ही बाळासाहेबांचीच… पण भाजप आता वाजपेयी-अडवाणींचा राहिलाय का?”

-राष्ट्रवादीत आता पुष्पगुच्छ, शाल भेटवस्तू बंद… त्याऐवजी ‘या’ गोष्टी द्या- शरद पवार