राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांना अभिवादन; दिला ‘हा’ खास संदेश

मुंबई | आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराजांना अभिवादन करत एक खास संदेश दिला आहे.

‘ज्याच्या अंगी छत्रपती शिवाजी महाराज भिनले असतील तो माणूस जातीपातीचा विचार कधीच करू शकणार नाही”, असं ट्वीट मनसेच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरुन करण्यात आलं आहे. तसेच यात शिवाजी महाराजांजी थोरवी सागंणाऱ्या काही ओळी आहेत.

निश्चयाचा महामेरु । बहुत जनासी आधारु ॥ अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील ॥ सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायी ॥, महाराजांची थोरवी गाणाऱ्या या ओळी ट्वीट करण्यात आल्या आहेत. त्याखाली राज ठाकरेंचा फोटो आहे.

दरम्यान, शिवजयंती निमित्त राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“काँग्रेस सरकारने कसाबला जिवंत पकडून फाशी दिली. देशभक्ती ती हीच!”

-ट्रम्प म्हणतात, मोदी आवडतात पण…

-छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नाहीत तर मंत्र; अमिताभ बच्चन यांनी दिली शिवरायांना मानवंदना

-नागराज मंजुळे-रितेश देशमुख घेऊन येणार शिवाजी महाराजांची ‘महागाथा’; टीझरद्वारे घोषणा

-शिवजयंतींच्या शुभमहुर्तावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केले शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर