औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव; ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई | औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

गेले अनेक वर्ष औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर या मागणीने जोर धरला आहे. तत्पूर्वी त्या अगोदरचं पाऊल म्हणून औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादचं नाव संभाजीनगर करून महाराष्ट्राला सरप्राईज देणार आहेत, असा दावा औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तत्पूर्वी विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव देऊन ठाकरे सरकारने एक पाऊल पुढे टाकण्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाचं नाव हे बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“ही लोक डोक्यावर पडली आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला??”

-सरकारी कर्माचाऱ्यांची खाती अ‌ॅक्सिस बँकेत वळवल्याचा फडणवीसांवर आरोप; कोर्टाने धाडली नोटीस

-नड्डाजी, खासदारकीचं तिकीट द्या बरं का- रामदास आठवले

-वक्तव्य मागे घ्या, अन्यथा… ब्राह्मण महासंघाचा सुजय डहाकेला इशारा

-सुजय डहाकेला कानफडण्याची सौरभ गोखलेची भाषा; काढली थेट लायकी!