हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करा आणि सर्व शंका विचारा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

मुंबई | सर्वसामान्यांना कोरोनासंबंधी माहिती मिळावी यासाठी राज्य सरकारकडून एक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोरोनासंबंधी माहिती देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटबोट ही सुविधा राज्य सरकारकडून सुरु करण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारने +912026127394 हा क्रमांक दिला आहे.

हा क्रमांक आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा. या ग्रुपमध्ये आल्यानंतर करोनासंबंधी आपल्या मनातील जे प्रश्न, शंका असतील त्यांची माहिती मिळेल असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. सध्या ही सुविधा इंग्रजीत असून मराठीत आणण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करु असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही लॉकडाउन केलं आहे. पण अत्यावश्यक सेवा आणि त्यासाठी लागणारे कर्मचारी आपल्याला ठेवाले लागतील अन्य़था गोंधळ निर्माण होईल, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

अनेक दुकानांमध्ये झुंबड उडाल्याचं कळत आहे. गैरसमज करुन घेऊ नका अशी विनंती आहे. मोदींनी मला युरोपमध्ये काय संकट निर्माण झालं आहे याची कल्पना दिली. ते वातावरण आणि परिस्थिती आपल्याकडे होऊ नये यासाठी काळजीपूर्वक पाऊलं उचलत आहोत.

महत्वाच्या बातम्या – 

-पोलिसांनी तेल लावून लाठी वापरावी- अनिल देशमुख

-…तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ!

-कोरोनाच्या संकटाची तीव्रता कमी होवो; राज ठाकरेंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

-“योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदींचं ऐकत नाही मग जनता त्यांचं का ऐकेल?”

-होळीला अ‌ॅडमिट, गुढीपाडव्याला डिस्चार्ज; पुण्यातील दाम्पत्याची ‘कोरोना’वर मात