देश म्हणून आपण चाललोय कुठे??; राज ठाकरेंची तोफ पुन्हा मोदींविरोधात धडाडली

मुंबई | पंतप्रधान म्हणाले दिवे पेटवा, लोक करतीलही, घरी बसून काहीतरी करायचं म्हणून करतील, पण केवळ दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता. लोकांची अपेक्षा होती की लॉकडाऊनविषयी त्यांनी काहीतरी बोलावं. पण ते काहीच बोलले नाहीत. लोकांमध्ये संभ्रम असताना संभ्रावस्था त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने संपवायची असते. मात्र त्यांच्याकडून असं होत नाही, अशी जोरदार टीका राज ठाकरे यांनी मोदींवर केली आहे.

हात जोडून विनंती आहे, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योग बंद राहतील, मंदी येईल, हे सगळं तुमच्या एका चुकीने होईल, असं कळकळीचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

या दिवसामध्ये जर कोणी काळाबाजार करत असेल त्यांना फोडून काढला पाहिजे, तुम्हाला कुटुंब आहेत की नाही? तुमच्याही अंगलट येईल. समाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे, नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञही असायला हवं, असं ते म्हणाले. भाज्यांवर थुंकणारे, नर्ससमोर नग्न होणारे यासारख्यांना फोडून काढलं पाहिजे, त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले पाहिजेत, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

जर लोक असेच वागणार असतील तर लॉकडाऊन वाढेलच, डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी यांना पेशंट शोधायलाच वेळ जाईल, घरी लोक लपून बसलेत, लक्षणे आढळलेल्यांनी स्वत: पुढे आले पाहिजे, असंही ते म्हणाले. तर लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, आक्षेपार्ह वागणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे, असंही राज म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-या लोकांना देशापेक्षा ‘धर्म’ मोठा वाटत असेल, तर यांना जगवायचं कशाला?- राज ठाकरे

-मुंबईत डीसीपी रँकचा पोलीस अधिकारी कोरोना संशयित!

-नरेंद्र मोदींनी मान्य केला उद्धव ठाकरेंचा ‘हा’ सल्ला, म्हणाले….

-‘आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं’; संजय राऊतांची मोदींवर बोचरी टीका

-‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!