“मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे”

मुंबई | मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मरकजविरोधातील संताप व्यक्त केला. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंतप्रधान म्हणाले दिवे पेटवा, लोक करतीलही, घरी बसून काहीतरी करायचं म्हणून करतील, पण केवळ दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता, अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

सर्व डॉक्टर स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत, पोलीस, शेतकरी, पाणीपुरवठा कर्मचारी आणि सरकार काम करत आहे, मात्र लोकांना गांभीर्य कळत नाहीय, असं राज म्हणाले.

मरकजचा महाराष्ट्रातील कार्यक्रम पोलिसांनी नाकारला त्याबद्दल मी महाराष्ट्रा पोलिसांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो, असंही राज म्हणाले. तसेच काळाबाजार करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे. संकटाच्या काळात ह्यांना या गोष्टी सुचतात कश्या, असा सवाल त्यांनी विचारला.

महत्वाच्या बातम्या –

-देश म्हणून आपण चाललोय कुठे??; राज ठाकरेंची तोफ पुन्हा मोदींविरोधात धडाडली

-या लोकांना देशापेक्षा ‘धर्म’ मोठा वाटत असेल, तर यांना जगवायचं कशाला?- राज ठाकरे

-मुंबईत डीसीपी रँकचा पोलीस अधिकारी कोरोना संशयित!

-नरेंद्र मोदींनी मान्य केला उद्धव ठाकरेंचा ‘हा’ सल्ला, म्हणाले….

-‘आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं’; संजय राऊतांची मोदींवर बोचरी टीका