मुंबई | प्रिय मुंबई पोलीस आपण हाक द्या, हा ‘सिंघम’ आपली ‘खाकी’ घालून आपल्या बाजूला उभा राहील, अशा शब्दात मुंबई पोलिसांना धीर देण्याचं काम अभिनेता अजय देवगणने केलं होतं. त्याच्या याच ट्विटला मुंबई पोलिसांनी खास अंदाजात उत्तर दिलं आहे.
डिअर सिंघम…तेच करत आहोत जे ‘खाकी’ करणं अपेक्षित आहे, जेणेकरुन गोष्टी पुन्हा एकदा तशाच होतील ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, असं उत्तर मुंबई पोलिसांनी अजयला दिलं आहे. या उत्तरामध्ये अजयच्या दोन्ही चित्रपटांची नावे घेत ही सगळी परिस्थिती पुन्हा पुर्ववत होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.
मुंबई पोलिसांच्या धैर्याला आणि आणि त्यांच्या प्रशंसनीय कामाला अनेक सेलिब्रेटींनी धन्यवाद दिले आहेत. अजयनेही धन्यवाद देताना मुंबई पोलिसांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, प्रिय मुंबई पोलीस…तुम्ही जगातील सर्वोत्तम असणाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जाता. करोनाशी लढा देताना तुम्ही दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तुम्ही जेव्हा कधी सांगाल तेव्हा हा सिंघम खाकी घालून तुमच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, असं ट्विट अजयने याअगोदर केलं होतं.
Dear Mumbai Police, you are known as one of the BEST in the world. Your contribution to the COVID-19 pandemic is unparalleled. Singham will wear his Khakee and stand beside you whenever you ask. Jai Hind, Jai Maharashtra 🙏@CPMumbaiPolice @MumbaiPolice
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 9, 2020
महत्वाच्या बातम्या –
-गायिका कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटीव्ह; डिस्चार्जनंतर होम क्वारंटाईन
-चौकशी म्हणजे निव्वळ डोळ्यात धुळफेक; अधिकाऱ्याला निलंबित करा- प्रसिद्ध IAS खेमका
-डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाग्रस्तचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी उचललं कडक पाऊल
-‘रक्षक क्लिनिक’ पॅटर्न राज्यभर राबवण्याचा विचार केला जाईल- आरोग्यमंत्री
-वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!