डॉक्टरांवर हल्ला केल्यास होणार अजामीनपात्र गुन्हा दाखल; मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | डॉक्टरांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाहीत. असे प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारने नवा अध्यादेश काढला आहे. त्यामध्ये ही तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दोन लाख रुपयापर्यंतच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे, असं जावडेकरांनी सांगितलं आहे.

सध्या करोनाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी हे प्राणांची बाजी लावून लढत आहेत. मात्र त्यांच्याविरोधात हिंसा करण्याचे, त्यांना हीन वागणूक देण्याचे प्रकार देशात घडले हे दुर्दैवी आहे. यापुढे हे मुळीच सहन केलं जाणार नाही, असं जावडेकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तीन महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल आणि 50 हजार ते 2 लाखापर्यंतचा दंडही वसूल करण्यात येईल, असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलंय.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-आमचा उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध नाही- चंद्रकांत पाटील

-चार महिन्यात सोलापूरला राष्ट्रवादीचा तिसरा पालकमंत्री

-Good News… कोरोनावर लस शोधल्याचा ऑक्सफर्डचा दावा!

-आपण लढणार आपण जिंकणार; मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ मेसेज

-मोदी सरकारने देशाचा विश्वासघात केलाय; अखिलेश यादवांची टीका