दिलासादायक! पुण्यात जम्बो रुग्णालयं उभारण्याबाबत अजित पवारांनी केली मोठी घोषणा!

पुणे | जगभरात कोरोनाने सध्या थैमान घातलं आहे. भारताचे आकडे पहिल्यापेक्षा आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यामध्ये आपल्या राज्यात पुणे शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलं आहे. कोरोनाचे पुण्यात रोज 1000 ते 1500 रूग्ण आढळू लागले आहेत. यादरम्यान पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुण्यासाठी एक गुडन्युज दिली आहे.

पुण्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी पुण्यात तीन ठिकाणी जम्बो रूग्णालयाची उभारणी करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. ही रूग्णालय कुठे आणि कशी उभारली जाणार याबद्दल लवकरच माहिती देणार असल्याचं पवारांनी सांगितलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी लागेल. पुणे शहरासह जिल्हयातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावं लागेल. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेतोपरी सहकार्य केलं जाईल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयाचं बिल स्वतंत्र लेखापरीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचारांची दरआकारणी केली आहे का, याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावं, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

चंपा, टरबुज्या म्हटलं तर…; भाजप नेत्यांना ठेवण्यात आलेल्या टोपण नावाने चंद्रकांत पाटील भडकले!