“ज्यांच्या रक्तात शिवसेना आणि ज्यांचा प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी होता, तो अखेर काळाने निष्ठुरपणे थांबवला”

मुंबई | आज महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन लखलखते तारे निखळल्याने राजकारणावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड आणि कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं आज निधन झालं आहे. या दोन्ही ताऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी भावपूर्ण शब्दांत आदरांजली वाहिली आहे.

अनिल भैया गेले ही वाईट बातमी समजली आणि धक्काच बसला. शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि ज्यांचा प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठुरपणे थांबवला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी राज्य महसूलमंत्री अनिल राठोड यांच्या निधनावर बोलताना शोक व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणाऱ्यांमध्ये निलंगेकर यांचा समावेश होता. निष्ठावंत राजकीय विचारसरणीच्या पाटील यांच्या निधनामुळे दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील यांना आदरांजली वाहिली आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि राज्याचे माजी महसूल मंत्री अनिल राठोड यांच्या निधनाने राजकारणावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“500 वर्षांची प्रतीक्षा संपली, 135 कोटी भारतवासियांसाठी आणि जगातील हिंदूंच्या भावनांना पूर्ण करणारे मोदी पहिले पंतप्रधान”

रामाचा वनवास अखेर संपला; ऐतिहासिक राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न

“राम मंदिराला न्याय मिळवून देणारे गोगाई अन् बाबरीची घुमटे पायापासून उध्वस्त करणारी शिवसेना कुठेच नाही”

पंतप्रधान मोदींचं प्रभू श्रीरामांना साष्टांग दंडवत; भूमिपूजन स्थळी दाखल

राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी असदुद्दीन औवेसींचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…