राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर राहुल गांधींचं ट्विट; राम म्हणजे…

नवी दिल्ली | राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला आहे. आत्ता थोड्यावेळापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर ट्विट केलं आहे.

राम म्हणजे प्रेमाचं प्रतीक. कोणाप्रती तिरस्कार किंवा घृणेतून ते व्यक्त होऊ शकत नाहीत. मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम हे सर्वोत्तम अशा मानवी गुणांचे प्रतीक आहे. आपल्या मनात वसलेल्या मानवतेची मूळ भावना म्हणजे भगवान राम, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राम प्रेम आहे, ते कधी घृणेद्वारे प्रकट होऊ शकत नाही. राम करुणेचं प्रतीक आहे, तिरस्काराद्वारे प्रकट होऊ शकत नाही. राम न्यायाचं मूर्तीमंत रुप आहे, अन्यायाद्वारे ते प्रकट होऊ शकत नसल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसतर्फे राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुहूर्तावर टीका करण्यात येत होती. भूमिपूजनाच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आंनदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे यावेळी उपस्थित होते.

 

महत्वाच्या बातम्या-

“500 वर्षांची प्रतीक्षा संपली, 135 कोटी भारतवासियांसाठी आणि जगातील हिंदूंच्या भावनांना पूर्ण करणारे मोदी पहिले पंतप्रधान”

रामाचा वनवास अखेर संपला; ऐतिहासिक राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न

“राम मंदिराला न्याय मिळवून देणारे गोगाई अन् बाबरीची घुमटे पायापासून उध्वस्त करणारी शिवसेना कुठेच नाही”

पंतप्रधान मोदींचं प्रभू श्रीरामांना साष्टांग दंडवत; भूमिपूजन स्थळी दाखल

राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी असदुद्दीन औवेसींचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…