…म्हणून सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंग आता ईडीच्या रडारवर!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या की आत्महत्या हा गुंता दिवसागणिक वाढतंच चालला आहे. सुशांतच्या मृत्यूच गूढ उलगडण्यासाठी हे प्रकरण आता सीबीआयने आपल्या हाती घेतलं आहे. सीबीआयने रिया आणि इतर 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. सुशांतचा मित्र संदीप सिंग याचीही आता ईडी चौकशी करू शकते.

संदीप सिंग हा सुशांतचा अगदी जवळचा मित्र होता. ईडीच्या हाती बँक स्टेटमेंट लागली आहे. बँक स्टेटमेंट नुसार संदीप सिंग आणि सुशांतमध्ये पैशाचा व्यवहार झाला होता. दोघांच्यात झालेला हा व्यवहार नेमका कशा संबंधित होता तसेच इतर काही महत्वाच्या बाबी जाणून घेण्यासाठी ईडी संदीपची चौकशी करणार आहे.

सुशांतची मैत्रीण स्मिता पारीख हिने अलीकडेच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी संदिप सिंग विषयी तिने काही महत्वाची माहिती दिली होती. संदीपला कुटुंबातील कोणताही सदस्य ओळखत नाही. संदिपने सुशांतच्या वस्तू कपूर हॉस्पिटलमध्ये गोळा केल्या. संदीपच्या पीआरने त्याची आणि सुशांतच्या बहिणीची छायाचित्रे क्लिक केली होती. संदीप सुशांतच्या जवळचा असेल पण फार पूर्वी असेल, असं स्मिता यावेळी म्हणाली होती.

दरम्यान, ईडीकडून सध्या रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती यांची चौकशी सुरू आहे. यावेळी सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीलाही ईडीने चौकशीसाठी बोलावलं होते. सीबीआयने रिया, शोविक आणि श्रुती या तिघांनाही पून्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मराठा आरक्षण कायम राहू नये यासाठी मोठं राजकीय षडयंत्र सुरू आहे’; अशोक चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप

…म्हणून आयएएस झालेल्या ऐश्वर्या श्योराण मॉडेलने केली पोलिसांत तक्रार!

प्रियंका गांधींच्या शिष्टाईमुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा; सचिन पायलटांचं बंड शमलं!

“विद्यार्थांना फी भरण्याची सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे, विद्यार्थ्यांकडून 50 टक्केच फी घ्यावी”

…तर सरकारला शॉक देऊ; वाढीव वीज बीलावरून राजू शेट्टी आक्रमक