“जे सरकार शिवरायांचा द्वेष करतं ते हिंदुत्ववादी कसं?, भाजपची नकली शिवभक्ती काय कामाची”

मुंबई | बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला होता. मात्र त्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

बेळगाव महापालिकेवरील शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा भगवा ध्वज उतरवून पायदळी तुडवण्याचे पातक कर्नाटकात झालंच आहे. आता शिवरायांना हटवलं. त्यामुळे जो पक्ष किंवा सरकार शिवरायांचा असा द्वेष करतं ते राज्य हिंदुत्ववादी कसं?, असा सवाल अग्रलेखातून संजय राऊत यांनी केला आहे.

कर्नाटकमध्ये जर काँग्रेस सरकार असतं तर भाजपने महाराष्ट्रात सांगली, साताऱ्यात तरी भाजपने धूमाकूळ घातला असता. परंतू आता ते थंड पडले आहेत. त्यामुळे ही नकली शिवभक्ती काय कामाची?, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी महाराजांचं स्मरण करतात आणि महाराजांच्यापुढे नतमस्तक होतात आणि कानडी मावळे रात्रीच्या अंधारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवतात याचा मेळ कसा लावायचा, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंग आता ईडीच्या रडारवर

‘मराठा आरक्षण कायम राहू नये यासाठी मोठं राजकीय षडयंत्र सुरू आहे’; अशोक चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप

…म्हणून आयएएस झालेल्या ऐश्वर्या श्योराण मॉडेलने केली पोलिसांत तक्रार!

प्रियंका गांधींच्या शिष्टाईमुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा; सचिन पायलटांचं बंड शमलं!

“विद्यार्थांना फी भरण्याची सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे, विद्यार्थ्यांकडून 50 टक्केच फी घ्यावी”