मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणावर काय परिणाम होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई | सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी मागणी ओबीसी समाजाकडून केली जात आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच्यावर महत्वाचं भाष्य केलं आहे.

आजपासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावर आमची वकिलांशी सातत्याने चर्चा चालू आहे. ओबीसी समाजातील प्रवर्गामध्ये मराठा आरक्षणावरून गैरसमज पसरवू नयेत.

ओबीसी प्रवर्गातील समाजाला त्यांच्या न्याय्य आणि हक्काचं जे आहे ते देऊ. त्यांच्या हक्काचं जे असेल त्यातील एक कणही कमी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच ठाकरे यांनी यावेळी विरोधकांवर देखील निशाणा साधला आहे.

ओबीसी समाजामध्ये गैरसमज पसरवू नका. विरोधकांनी राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करु नये. विरोधकांनी राज्यात जी एकजूट आहे तिला तडा देवू नये, असं म्हणत ठाकरेंनी विरोधी पक्षातील नेत्यांना खडसावलं आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर सडकून टीका केली होती.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही. पण, ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लावल तर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू. ओबीसी आरक्षणाबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा जागीच मृ.त्यू

खुशखबर! “डिसेंबर मध्येच लशीला परवानगी मिळेल अन् जानेवारीत लशीकरण चालू होईल” – आदर पुनावाला

धनंजय मुंडेंची लहान बहिणीला भावनिक साद, पंकजा मुंडेंचा काय प्रतिसाद?

धक्कादायक! आणखी एका बड्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृ.त्यू

‘त्या’ दिवशी शरद पवार खोटं बोलले आणि लाखो लोकांचा जीव वाचला!