मोठी बातमी! अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल, जडला ‘हा’ गंभीर आजार

मुंबई | आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण जगभरात नाव करणाऱ्या दक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हैद्राबादच्या अपोलो रुग्णालयाने स्वतः प्रसिद्धीपत्रक काढत ही माहिती दिली आहे.

आज सकाळी अचानक रजनीकांत यांची प्रकृती खालावली होती. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी रजनीकांत यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याचं रुग्णालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

रजनीकांत यांना इतर कोणताही आजार नसल्याचं देखील रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच रजनीकांत काम करत असणाऱ्या एका चित्रपटाच्या सेटवर 8 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे रजनीकांत यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, रजनीकांत यांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले होते.

तसेच सध्या अपोलो रुग्णालयाने देखील आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, रजनीकांत यांना कोव्हीड-19ची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. रजनीकांत यांना केवळ रक्तदाबाचा त्रास आहे.

दरम्यान, अभिनेते रजनीकांत यांचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. कारण त्यांचा साधेपणा आणि त्यांच्या विविध स्टाईल चित्रपट रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. रजनीकांत नेहमी त्यांचा चाहत्यांना पाठिंबा देत असतात.

रजनीकांत त्यांच्या चाहत्यांना कायम भेटायला जात असतात. चेन्नईतील राघवेंद्र मंडपममध्ये ते आपल्या चाहत्यांना भेटतात, बोलतात आणि चर्चा करतात. तसेच त्यांच्याबरोबर फोटोही काढतात.  असंच काही दिवसांपूर्वी रजनीकांत एका गोष्टीमुळे चर्चेत  आले होते.

काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी आपल्या चाहत्याला फोन करून त्याच्या तब्येतीविषयी विचारले होते. ४५ वर्षीय मुत्थामानी नावाच्या चाहत्याने सर्वात प्रथम रजनीकांत यांच्या चाहत्यांचा क्लब तयार केला होता.

मुत्थामानी हे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रजनीकांत यांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी या चाहत्याला फोन केला. त्याच्या तब्येतीविषयी विचारले. मुत्थामानी याच्यासाठी देखील हा सुखद धक्का असल्याचं त्याने म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

“शरद पवार तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे”

ममता बनर्जींला मोठा धक्का! पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसची मोठी राजकीय खेळी

प्रियांका गांधींसह अनेक कॉंग्रेस नेत्यांना अटक आणि सुटका

राजधानीत राडा! शेतकऱ्यांना पाठींबा दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी फोडलं आपच्या आमदाराचं ऑफिस; पाहा व्हिडिओ

‘KBC’तील एक कोटी फक्त नावालाच, वाचा करोडपती होणाऱ्या स्पर्धकाला किती रुपये मिळतात?