हैदराबाद | आजकाल सोशल मिडीयावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही मजेशीर असतात, तर काही भावूक करणारे असतात. अशात सोशल मिडीयावर सध्या दक्षिणात्य अभिनेत्री निक्की गलराणीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत निक्की गलराणी शाळेतील वॉचमन सोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ निक्कीने स्वत:च्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन शेअर केला आहे.
निक्की गलराणी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपटाचे चित्रीकरण एका शाळेत सुरु होते. निक्कीने त्या शाळेतील वॉचमन काकांसोबत डान्स करत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
निक्कीची त्या शाळेतील वॉचमन काकांसोबत चांगलीच गट्टी जमली आहे. वॉचमन काकांना भेटून मला खूप आनंद झाला असल्याचेही तिनं सांगितलं आहे. तसेच त्यांच्याकडून खूप सकारात्मकता शिकता आली, असंही निक्की म्हणाली आहे.
त्या व्हिडीओमध्ये निक्की वॉचमन काकांसोबत डान्स करत आहे. त्याचबरोबर तिला वॉचमननी डान्सचे धडे दिले असल्याचंही व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ शेअर करताना निक्कीने एक कॅप्शनही लिहिले आहे.
जसा आपण विचार केलेला असतो, तसा आनंद आपण आयुष्यात साजरा करु शकत नाही. पण सध्या आम्ही येथे आहोत, डान्स पार्टी करुच शकतो, असं नक्कीने लिहिलं आहे. व्हिडीओमध्ये वॉचमन मजेशीर डान्सच्या स्टेप करताना दिसत असून, निक्की त्यांच्या स्टेपची नक्कल करताना दिसत आहे. त्यांच्या या निरागस व्हिडीओचं अनेकांनी सोशल मिडीयावर कौतुक देखील केलं आहे.
दरम्यान, निक्की गलराणी लवकरंच दिग्दर्शक राम बलाच्या इडियट आणि दिग्दर्शक काथिरवेलू यांच्या राजवंशम या चित्रपटात झळकाणार आहे. निक्कीला डार्लिंग चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ठ डेब्यू अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
प्रियंकाचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, ‘या’ एका व्हिडिओमुळे मिळाल्या होत्या बला.त्काराच्या ध.मक्या
मोठी बातमी! खासदार डेलकरांच्या पोस्टमा.र्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
पतंजलीला मोठा झटका! ‘या’ औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही
काय सांगता! 15 मेपासून व्हॉट्सअपवर मेसेज पाठवता येणार नाहीत?
तुम्हालाही गोरी आणि चमकदार त्वचा हवी आहे का?, मग हा घरगुती स्क्रब नक्की वापरुन पाहा