आणखी एका स्टारकिडचं कलाविश्वात पदार्पण, झळकणार ‘या’ भूमिकेत

मनोरंजन विश्वात अनेक नवनवीन कलाकार आपली करमणूक करण्यासाठी सज्ज असलेले पहायला मिळतात. अनेक स्टारकिड्स आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मनोरंजनाच्या विश्वात पदार्पण करताना पहायला मिळत असून स्वतः ची नवी अशी ओळख बनवण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच आता आपली करमणूक करण्यासाठी आणखी एक स्टारकिड सज्ज झालेला असून या लिस्टमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे.

मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेला नवीन स्टारकिड म्हणजेच सोहम बांदेकर. सोहम बांदेकर हा आपले लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि सुमिञा बांदेकर यांचा मुलगा असून तो लवकरच स्टार प्रवाहाच्या एका नव्या मालिकेमधून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे.

आदेश बांदेकर ‘नवे लक्ष्य’ ही स्वत:ची मालिका निर्मिती करणार असून या मालिकेतून सोहम पदार्पण करणार आहे. या मालिकेत सोहम पोलिसांची भूमिका साकारणारताना पहायला मिळणार आहे. ही त्याची पहिलीच मालिका असून या मालिकेमधून तो मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे.

‘नवे लक्ष्य’ ही मालिका ७ मार्च पासून पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. स्टार प्रवाहावर राञी १० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमोदेखील नुकताच रिलीज झाला आहे.

या मालिकेमधून एकंदरीत आपल्याला पोलिसांचा संपूर्ण प्रवास अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्र पोलिस सतत कसे कार्यरत असतात, २४ तास जनतेच्या रक्षणासाठी कसे झटतात, गुन्हेगारांना आपल्या युक्तीनं कसं अटक करतात, या सगळ्या गोष्टी मालिकेतून आपल्या पहायला मिळणार आहे.

‘आपले कर्तव्यनिष्ठ पोलीस आणि त्यांच्या डिपार्टमेंटची शौर्यगाथा सांगताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. काय कस लागतो, काय हुशारी लागते आणि कसे तुम्हाला सतर्क राहण्यास मदत होईल हे या मालिकेतून लवकरच तुम्हाला उलगडेल. ही मालिका पाहताना आपल्या पाठीशी भावा-बहिणीप्रमाणे खंबीरपणे आपले महाराष्ट्र पोलीस उभे आहेत याची तुम्हाला जाणीव होईल.’ असं स्टार प्रवाहचे प्रोग्रामिंग हेड सतीश राजवाडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनेक कलाकार मनोरंजन करण्याच्या दृष्टीनं कलाविश्वात पदार्पण करत असतात. स्टारकिड्सनं आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कलाविश्वात पदार्पण करणं यात काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे अनेक स्टारकिड्सचा कल मनोरंजन क्षेत्रात असलेला पहायला मिळतो.

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणी एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा

….म्हणून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ – मुंबई महापालिका आयुक्त

आण्णा तुला गर्लफ्रेंड आहे का?, तरुणीच्या प्रश्नानी राहुल गांधी क्लिन बोर्ड

खुशखबर! सोनं तब्बल 16 टक्क्यांनी घसरलं; वाचा आजचे ताजे दर

‘त्या रात्री फराह माझ्या रुममध्ये घुसली अन् मग… ‘; करण जोहरने सांगितलं मोठं सिक्रेट