पूजा चव्हाण प्रकरणात नवीन ट्वीस्ट! ‘या’ कारणाने भाजप नगरसेवकाला पुणे पोलिसांची नोटीस

पुणे | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुऴात चांगलीच खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाण प्रकरणी रोज काही ना काही नवीन माहीती समोर येत आहे. अशातच आता याप्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणी भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आम्हाला संशय आहे की, पूजा चव्हाणचा लॅपटॉप तुमच्याकडे आहे. यामुळे तो लॅपटॉप तुम्ही पोलिसांना आणून द्यावा, असं पुणे पोलिसांनी घोगरे यांना बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

पूजाने ज्यावेळी ईमारतीतून उडी घेत आत्मह.त्या केली. त्यावेळी घटनास्थळी परिसरातील भरपूर लोक जमा झाले होते. धनराज घोगरे देखील त्यावेळी घटनास्थळी आले होते. त्यावेळी धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप बीडच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या संगिता चव्हाण यांनी केला आहे.

याच संशयावरुन घोगरे यांना पुणे पोलिसांना नोटीस बजावली आहे. मात्र, घोगरे यांनी पत्रकार परिषद घेत आपण लॅपटाप घेतलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना धनराज घोगरे म्हणाले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणापासून माझे घर हाकेच्या अंतरावर आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथे गेलो होतो.

मी तिला फक्त रिक्षात उचलून ठेवलं आणि पोलिसांना पहिला फोन मीच केला होता. मला तिचं नाव पूजा आहे हे देखील माहित नव्हतं. मोबाईल आणि लॅपटॉपचं मला काहीही माहित नाही. पोलिसांनी पंचनामा करुन सर्व गोष्टी ता.ब्यात घेतल्या आहेत, असं धनराज घोगरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण टिकटॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उ.डी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आ.त्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 12 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच खळबळ उडाली.

या प्रकरणामागे संंजय राठोड यांचा हात असल्याचा आ.रोप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षातील नेते करत आहेत. या प्रकरणी आता पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिग्दर्शक अभिषेक कपूर सुशांतच्या आठवणीत व्याकूळ, व्हिडिओ शेअर करत म्हणाले…

“मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का?”

जाणून घ्या! बीट खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

आयकर विभागाच्या छापेमारीनंतर तापसी पन्नूची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली….

मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…