‘मित्राला लस घेण्यासाठी तयार केल्यास मिळणार…’; वाचा सरकारची भन्नाट ऑफर

बर्न | स्वित्झर्लंडमध्ये लसीकरणाचा वेग कमी आहे. देशात मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध असून देखील नागरिक लसीकरण करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे. स्वित्झर्लंडमध्ये लसीकरणाच्या विरोधात अनेक मोर्चे आणि आंदोलनं झाली होती. त्यामुळे लसीकरण करू नये, या मताचे अनेक नागरिक देशात आहेत.

नागरिकांच्या विरोधामुळे लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठणं सरकारला शक्य होत नाहीये. यामुळे अधिकाधिक वेगाने लसीकरण होण्यासाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. आपल्या मित्राला कोरोनाची लस घेण्यासाठी तयार केलं आणि त्यानं लस घेतली तर तुम्हाला मनपसंत हॉटेलमध्ये मोफत जेवण देणार असल्याचं सरकारने म्हटलंय.

तुम्हाला जेवण नको असेल, तर तुम्ही तुमच्या आवडत्या सिनेमागृहात मोफत सिनेमा पाहू शकता, असंही सरकारने म्हटलंय. स्वित्झर्लंडनं देशातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ही अनोखी योजना आखली आहे.

जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या मित्राला किंवा इतर कुठल्याही लसीकरण न झालेल्या नागरिकाला लस घेण्यासाठी प्रवृत्त केलं, तर त्याला सरकार बक्षीस देणार आहे. यात मोफत भोजन करा किंवा मोफत चित्रपट पाहा, असं सरकारनं म्हटलं आहे.

टोकनच्या रुपात हे बक्षीस दिलं जाईल. प्रत्येक टोकनची किंमत आहे. 50 स्विस फ्रँक्स आहे. प्रत्यक्ष रोख रकमेऐवजी हे टोकन त्या व्यक्तीला दिलं जाईल आणि हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह इथे ते टोकन त्याला वापरता येईल. याठिकाणी जेवढं बिल होइॅल, त्यातून बक्षिसाची रक्कम वळती केली जाईल.

स्वित्झर्लंडची लोकसंख्या ही साधारण 87 लाखांच्या घरात आहे. यापैकी 42 टक्के नागरिकांचं लसीकरण अद्याप झालेलं नाही. युरोपातील सरासरीचा विचार करता हा आकडा गंभीर असून लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

पश्चिम युरोपात सगळ्यात कमी लसीकरण सध्या स्वित्झर्लंडमध्ये झालंय. येत्या काळात आपल्या देशाला त्याचा फटका बसू नये याची तीव्र चिंता सरकारला लागून आहे. देशाला आतापर्यंत एक कोटी 19 लाख डोस मिळाले आहे. मात्र आतापर्यंत केवळ एक कोटी डोस वापरले गेले आहेत. सरकारचंही म्हणणं आहे, कोरोना पेशंट्सची संख्या आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात वाढली नसली, तरी आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांची संख्याही कमी झालेली नाही. भविष्यात ही स्थिती अडचणीची ठरू शकते.

देशातील लोकांचं लसीकरण वाढावं म्हणून आजपर्यंत अनेक देशांनी आपल्या नागरिकांना लालूच आणि बक्षीसं देऊ केली आहेत. हाँगकाँगमध्ये 14 लाख डॉलर किंमतीच्या फ्लॅटची लकी ड्रॉ ऑफर जाहीर केली होती.

महत्वाच्या बातम्या-

हत्ती एकमेकांचा किस घेतानाचा व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

शाइनिंग करत साप पकडायला गेला अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ

लग्न व्हायच्या आधीच तरूणाला मित्राणे दाखवलं लग्नानंतरचे आयुष्य, पाहा मजेशीर व्हिडीओ

बॉयफ्रेंडला मिठी मारायला गेली तरूणी अन् घडला भलताच प्रकार, पाहा व्हिडीओ

समुद्रकिनारी पर्यटक थांबलेले असताना अचानक भलीमोठी शार्क आली पाण्यातून बाहेर अन्…,पाहा धक्कादायक व्हिडीओ