भाऊबीजेला भेट म्हणून सुप्रिया सुळे अजित पवारांकडे सिलेंडर मागणार

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना काळात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सात्त्याने इंधनाच्या किंमती वाढल्याचं दिसून येतंय.

काँग्रेसने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून केंद्र सरकारला घेरलं होतं. महाराष्ट्रात काँग्रेसने ठिकठिकाणी याविरोधात आंदोलने देखील केली होती. अशातच आता देशातील वाढती महागाई आणि इंधन दरवाढ यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आर्यन खान जितके दिवस जेलमध्ये जितके दिवस होता. तेवढे दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये किती वाढ झाली याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

लोकांचं इंधन दरवाढीकडे लक्ष जाऊ नये म्हणून आर्यनला इतके दिवस तुरूंगात ठेवलं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून घरगुती सिलेंडरच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यावरून देखील सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला आहे.

गॅस दरवाढीमुळे मी येत्या दिवाळीत भाऊबीज म्हणून अजित पवार यांच्याकडे आणि इतर भावांकडे गॅस सिलेंडर मागणार असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

आम्ही आठ बहिणींनी ठरवलं आहे की, या भाऊबीजेला आमच्या सहा भावांकडून पुढील सहा महिन्यांसाठी प्रत्येकाला एक एक सिलेंडर द्यायचा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

आमचं संपूर्ण कुटूंब एकत्र बसून दिवाळीचं फराळ करतो. प्रत्येकाकडं वेगवेगळी कामं दिसलेली असतात. करंजी बनवताना सर्वांना एकच काम असतं. मात्र, त्यावेळी पुरूषांना त्याठिकाणी प्रवेश नसतो, असा किस्सा सुप्रिया सुळे यांनी सांगितला आहे.

पुरूषांनी फराळ करताना मध्ये-मध्ये केलं की फराळ फसतो. या विभागात सर्वात कमी टॅलेन्टेड मी आहे. माझ्याकडं फक्त थंड झालेली करंजी मोठ्या डब्यात भरून ठेवायचं काम असतं, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

आपल्याला सर्वांना दिवाळीत आणि दसऱ्यात जेवढा सिलेंडर लागतो जेवढा कधीच लागत नाही. अशातच घरगुती सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने सामान्यांना फटका बसतोय, असंही सुळे म्हणाल्या.

दरम्यान, केंद्र सरकारला आर्यनला तुरूंगात ठेऊन आणखी भाववाढ करायची होती असं मला वाटतंय, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी, दिवाळीही निघणार तुरुंगात

 “अनिल देशमुख यांना फसवलं गेलंय”

  शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला- उद्धव ठाकरे

“ठाकरे सरकारच्या मदतीनंच परमबीर सिंग गायब”

“तुमच्याही फायली तयार आहेत, 2024 नंतर भेटू”