“कितीही प्रयत्न करा महाविकास आघाडी सरकार पडणार नाही”

मुंबई | 2019 ला राज्याच्या राजकारणात इतिहास घडला होता. कायम एकत्र असणारे शिवसेना आणि भाजपनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. राज्यात सध्या जोरदार टीका टीपण्णी चालू आहे. अशातच आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या एकीबद्दल विश्वास दाखवला आहे.

राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांची मोठी मोहिम चालू आहे. केंद्रीय यंत्रणांच्या रडावर सध्या महाविकास आघाडीचे नेते आहेत. काहीही केलं तरी महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी 12 वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

भाजपवर आपल्या खास शैलीत नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. परमबीर सिंग गायब होवू द्या, ईडीकडून अनिल देशमुखांना अटक करण्यात आली तरी महाविकास आघाडीला काही होणार नाही, अशी गर्जना नाना पटोले यांनी केली आहे.

नेत्यांना अटक करुन सरकार पाडता येईल, या गैरसमजात भाजपवाले आहेत. पण मला त्यांना सांगायचंय, तुम्ही कितीही प्रयत्न करा, महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही, असं नाना पटोले यांनी ठासून सांगितलं.

आयकर विभागानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई केल्यानं राज्यात खळबळ माजली होती. यावरून भाजपवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

केंद्रातील भाजपचं सरकार सर्वच क्षेत्रात नापास झालं आहे. त्यामुळे या अपयशाला बगल देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं जातंय. ज्यांनी आरोप केले ते परमबीर सिंग गायब आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

याप्रसंगी नाना पटोले यांनी भाजपला चांगलंच घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक, अजित पवारांसंबंधी संपत्तीच्या अफवा ही भाजपकडून मुद्दामून सगळं सुरु आहे. पण यामुळे सरकार आणखी मजबूत होईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत.

अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करून काहीच निष्पन्न होणार नाही, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले यांच्या घणाघाती टीकेनंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आयकर विभाग आणि ईडीच्या कारवाईवरून राज्यातील भाजप नेते आणि सरकारचे विद्यमान मंत्री यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 “दुसऱ्यांची मालमत्ता जप्त करून अजित पवारांची बदनामी केली जातीये”

“अनिल देशमुखांवरील कारवाई योग्यच, आता अजित पवारांनी कारवाईला सामोरं जावं”

“ठाकरे सरकारच्या मदतीनंच परमबीर सिंग गायब”

“तुमच्याही फायली तयार आहेत, 2024 नंतर भेटू”

सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना- राम कदम