“मशिदीत पहाटेची अजान होणार नाही, पण साईबाबांची काकड आरती थांबवू नका”

शिर्डी | शिर्डीतील मुस्लीम समुदायाने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. भोंगा वादामुळे मशिदींमधील पहाटेची अजान बंद झाली असली तरी साईबाबांच्या मंदिरातील स्पीकरवरून होणारी काकड आरती थांबवू नका, अशी विनवणी शिर्डीतील मुस्लीम समुदायाकडून करण्यात आली आहे.

आम्ही सहापूर्वी मशिदीत होणारी अजान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  शिर्डीतील मुस्लीम समाजाने भोंगा वादामुळे साई मंदिरातील बंद झालेली काकड आरती सुरु ठेवावी, असं म्हटलं आहे.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरुवारी पहाटे स्पीकरविनाच काकड आरती संपन्न झाली. त्यामुळे आज काकड आरतीच्यावेळी मंदिरात स्पीकर लावण्यात आला नाही. मात्र या निर्णयामुळे शिर्डीत येणारे साईभक्त नाराज झाले आहेत.

दरम्यान, उस्मानाबादमध्येही हिंदू-मुस्लीम ऐक्याचं एक चांगलं उदाहरण पाहायला मिळालं आहे. मानवता हाच खरा धर्म असा नारा देत उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येत नमाज आणि हनुमान चालीसा पठण केलं.

सर्व धर्म एक आहेत, केवळ राजकीय हेतूने सध्याचं राजकारण सुरु आहे. फोडा आणि राज्य करा ही निती आजही वापरली जात आहे. मात्र तरुणांनी एकत्र यावं असा संदेश यावेळी देण्यात आला.

राज ठाकरे यांनी काल ट्विट करून पुन्हा एकदा आंदोलनावर ठाम असल्याचे जाहीर केलं होतं. त्यांनी केवळ मनसे कार्यकर्ते नव्हे, तर देशभरातील हिंदुंना उद्देशून हे आवाहन केले होते. त्यामुळे राज्यात बुधवारची पहाट नेमकी कशी होणार याबाबत सर्वांचा चिंता होती. मात्र अनेक ठिकाणी हिंदू -मुस्लिम ऐक्याचं दर्शन झालं.

महत्त्वाच्या बातम्या- 

सेक्स लाईफबाबत दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य, म्हणाली… 

‘या’ भागात चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता! 

पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची संधी; मिळेल ‘इतका’ पगार 

“साहेब हृदयावर हात ठेवून सांगा…”; संदीप देशपांडे भावूक 

 ‘आगामी निवडणुकीत भाजप 27 टक्के तिकीटे ओबीसींना देऊन समाजाला न्याय देईल’