कौतुकास्पद! या जोडप्यानं लग्न खर्च वाचवून तब्बल 500 श्वानांना केली ‘अशी’ मदत

नवी दिल्ली | प्राण्यांवर प्रेम करणारे अनेकजण आहेत. काही लोक माणसांपेक्षा जास्त प्रेम प्राण्यांवर करतात आणि माणसांपेक्षा जास्त काळजी प्राण्यांची घेत असतात.

तुम्हाला आता अशाच एका जोडप्याविषयी सांगणार आहोत, ज्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ओडिशातील भुवनेश्वरमध्ये राहणाऱ्या युरेका आप्टा आणि जोना या जोडप्याने त्यांचे लग्न मंदिरात केले. त्यानंतर या जोडप्याने बोलता न येणाऱ्या एक दोन दहा वीस नाही तर तब्बल 500 प्राण्यांना खावू घातलं.

युरेका आप्टा आणि जोना या जोडप्याने 25 सप्टेंबर रोजी लग्न केले. या जोडप्याने पशु कल्याण ट्रस्ट एकमरा (एडब्ल्यूटीई) यांच्या संस्थेतील स्वयंसेवकांची मदत घेतली. त्यांच्या मदतीने इकडे तिकडे फिरणाऱ्या श्वानांना त्यांनी खायला दिले.

एनडीटीव्हीच्या एका अहवालानुसार युरेका आप्टा हे चित्रपट दिग्दर्शक आहे आणि जोना वांग या दंत चिकित्सक आहेत. या जोडप्याने लग्नाच्या दिवशी 500 पेक्षा अधिक इकडे तिकडे फिरणाऱ्या श्वानांना खाऊ घालण्यासाठी एक स्थानिक पशु बचाव संघटनेसोबत करार केला होता.

दोघांनी अतिशय साध्या पद्धतीने स्थानिक मंदिरात जाऊन लग्न केले. त्यानंतर त्यांनी प्राण्यांसाठी काहीतरी करावे यासाठी संघटनेच्या मदतीने 500 श्वानांच्या जेवणाची व्यवस्था केली. यानंतर ही घटना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली.

युरेका आप्टा यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. या जोडप्याने केलेल्या कामाने त्यांनी अनेकांचे हृदय जिंकले आहे. त्यांनी केलेल्या या कामाचे लोक भरभरून कौतुक करत आहे. दोघांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 3 वर्षांपूर्वी एकमेकांना असं काम करण्याचे वचन दिले होते.

एकमरा यांच्या मदतीने त्यांनी प्राण्यांच्या खाण्याची व्यवस्था केली, त्याचबरोबर त्यांनी धनादेशाद्वारे काही रक्कम दान केली आहे. एका अहवालानुसार या जोडप्याला प्राण्यांचा खूपच जास्त जिव्हाळा आहे. या वर्षाच्या सुरवातीला त्यांनी एका श्वानाचा जीवही वाचवला होता. त्या अपघातात त्याला खूपच लागले होते.

या श्वानाला आश्रय देण्याच्या शोधात असताना त्यांना एकमरा या एनजीओविषयी माहिती मिळाली होती. बोलता येणाऱ्या दोन माणसांची हाक एकमेकांपर्यंत कधी पोहोचेल माहित नाही पण या जोडप्याने फक्त प्रेम आणि जिव्हाळ्याने मुक्या प्राण्यांची हाक ऐकली आहे. प्रत्येकाने ही गोष्ट नक्कीच त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! कोरोनाकाळात तब्बल ‘एवढ्या’ सायकली विकल्या गेल्या

बिहारच्या गरजू मुलींना सॅनिटरी पॅड मिळावं म्हणून युवतींनी मिळून केलं ‘हे’ काम

आयपीएल मधील धोनीचा ‘तो’ विक्रम मोडीत काढत विराटनं रचला नवा इतिहास

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘त्या’ प्रकरणी अडकणार? ईडीची मोठी कारवाई

अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुहूर्तावर सोडलं मौन म्हणाले…