मुंबई | सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचं एक माध्यम समजलं जातं. सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करून जातात तर काही व्हिडीओ आपल्याला थरारक अनुभव देऊन जातात. तसेच सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक सिंहाचा आणि त्याच्या मालकाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या देखील अंगावर काटा येईल. मात्र, नंतर तुमच्याही लक्षात येईल की हा मालक सिंहाबरोबर मस्ती घालत आहे.
सिंहाला जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. जंगलातील सर्वाधिक हिंस्त्र प्राण्यांपैकी हा एक आहे. आपल्यापैकी कित्येकांनी या प्राण्याला प्रत्यक्षात पाहिलं नसेल. सिंहाला लांबून जरी पाहायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो. मात्र, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क सिंहाबरोबर मस्ती करताना दिसत आहे.
इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती सिंहाच्या समोर दोन पायांवर बसलेला आहे. तो व्यक्ती जणू सिंहाला एकंच खुन्नस देत आहे. सिंह देखील त्या व्यक्तीकडे नजर रोखून पाहत आहे.
इतक्यात अचानक तो सिंह त्या व्यक्तीच्या दिशेने धावत येतो आणि त्याच्या अंगावर जोरदार उडी टाकतो. तो व्यक्ती सिंहाला अडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सिंहाच्या ताकदीपुढे त्या व्यक्तीचा टिकाव लागत नाही आणि तो जमिनीवर पडतो.
तो व्यक्ती जमिनीवर पडताच सिंह त्याच्या अंगावर खेळू लागतो. तेवढ्यात इतर आणखी दोन सिंह येतात आणि त्या व्यक्तीच्या अंगावर मस्ती करू लागतात. या तीन सिंहांच्या मध्ये हा व्यक्ती चांगलाच अडकतो.
महितीनुसार, या व्यक्तीचं नाव डीन शिंडर असं आहे. डीन शिंडर सिंहांबरोबरंच अनेक व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करत असतो. तसेच सोशल मीडियावर त्याचे खूप सारे फॉलोअर्स आहेत.
दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव तर केलाच आहे. सोबतच या व्हिडिओला भरभरून लाईक देखील केलं आहे. तुम्ही देखील हा थरारक व्हिडीओ नक्की पहा.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
‘या’ मुलीचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल फिदा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल
कौतुकास्पद! खुद्द पंतप्रधानांनी देखील रस्त्यावर गाणी गाणाऱ्या ‘या’ तरुणांना नावाजलं; पाहा व्हिडीओ
बॉलिवूडच्या ‘या’ खलनायक अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस
दोन लग्न तुटल्यानंतर शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम…
कडाक्याच्या उन्हात हत्तीच पिल्लू पाण्यात पोहण्याचा आनंद कसं…