‘या’ मुलीचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल फिदा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

मुंबई | सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचं एक माध्यम आहे. अनेक कलाकारांच्या सुप्तगुणांना सोशल मीडियामुळे वाव मिळत असतो. सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओजने कित्येक लोकांचं आयुष्य देखील बदलून टाकलं आहे.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलीच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये गोव्यात शिकणारी एक मुलगी ब्रेक डान्स करत धमाल उडवून देताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतील मुलीचा डान्स पाहिल्यानंतर तुम्ही देखील तिच्या डान्सवर फिदा व्हाल.

माहितीनुसार, या मुलीचं नाव झेहरा अली असं आहे. झेहरा ही मूळची लखनौ येथील आहे. मात्र, सध्या ती गोव्यात आर्किटेक्चरचं शिक्षण घेत आहे. झेहराला लहानपणीपासूनच डान्सची आवड आहे. ती गेल्या 15 वर्षांपासून डान्स शिकते. झेहरा आत्तापर्यंत कित्येक डान्स स्पर्धांची विजेती ठरली आहे.

झेहराचा सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वी ती कॉलेजमध्ये परफॉर्मन्स देत होती, त्यावेळचा आहे. त्यावेळी कॉलेज मधील एका विद्यार्थ्याने हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हा देखील हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि आत्ताही हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, झेहरा कॉलेजच्या प्रांगणात उभी आहे. तिच्या आजूबाजूला कॉलेजचे इतर विद्यार्थी देखील उपस्थित आहेत. हे विद्यार्थी झेहराला प्रोत्साहन देत आहेत. कोणत्यातरी स्पर्धेचं ऑडिशन चालू असल्याचं हे दृश्य वाटत आहे.

यावेळी झेहरा दोन प्रसिद्ध गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. झेहरा पॉपिंग हा डान्स प्रकार सादर करत आहे. उपस्थित सर्वजण झेहराला प्रोत्साहन देत आहेत. झेहराचे हावभाव देखील अगदी घायाळ करणारे आहेत.

झेहरा ज्यावेळी गोळी मारण्याची स्टेप करते तेव्हा ती स्टेप पाहून उपस्थित सर्वजण तिच्या डान्सवर आणखी फिदा होतात. एकंदरीत काय तर झेहराने वेस्टर्न डान्सला आपल्या अदांनी दिलेला तडका मन आनंदी करून जातो.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव तर केलाच आहे. सोबतच या व्हिडिओला भरभरून लाईक देखील केलं आहे. तुम्ही देखील झेहराचा हा डान्स व्हिडीओ नक्की पहा.

महत्वाच्या बातम्या – 

कौतुकास्पद! खुद्द पंतप्रधानांनी देखील रस्त्यावर गाणी गाणाऱ्या ‘या’ तरुणांना नावाजलं; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडच्या ‘या’ खलनायक अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

दोन लग्न तुटल्यानंतर शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम…

कडाक्याच्या उन्हात हत्तीच पिल्लू पाण्यात पोहण्याचा आनंद कसं…

साडे सात लाख रुपयांसाठी तो विषारी सापांमध्ये झोपला…