चक्क एका अजगराने गिळलं जिवंत हरिण, पाहा व्हायरल व्हिडीओ

जयपूर | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर काही व्हिडीओ खूपच प्रेरणा देणारे असतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही व्हिडीओ हे प्राण्यांचे देखील असतात. काहीवेळा ते पाळीव प्राण्यांचे असतात, तर कधी जंगलातील प्राण्यांच्या हाणामारीचे असतात. अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये चक्क एका अजगरने जिवंत हरणाला गिळलं असल्याचं समजतं आहे. जंगलामध्ये एका ठिकाणी दाट गवताच्यामध्ये एका अजगराने आपला संपूर्ण जबडा उघडून एका हरणावर हल्ला केला असल्याचं समजतं आहे.

अजगराने त्या हरणाला निम्म गिळलं असून, उरलेलं हरणाचं शरिरही गिळण्याचा प्रयत्न तो अजगर करत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

जिवंत हरणाला गिळल्यामुळे ते हरिण आपल्या जिवाच्या आकांताने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू अजगराच्या शक्तीसमोर त्याचं काहीच चालत नसल्याचंही दिसून येतं आहे.

अजगर आणि हरणाचा हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिलं असून, त्याला कमेंटही केलं असल्याचं समजतं आहे.

https://twitter.com/alkesh_kushwaha/status/1438106190551011329?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1438106190551011329%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fpython-swallowed-deer-alive-in-rajasthan-video-viral-mhpl-605223.html

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! आता होणार चालता बोलता दाढी-मिशी, पाहा व्हायरल व्हिडीओ

शाइनिंग करत माकडासोबत फोटो काढायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ

दोन दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर

अंकिता लोखंडे बनली देवदासची पारो, डान्स पाहून चाहते घायाळ

कौतुकास्पद! ढोलकवर थाप मारत चिमुकल्यानं गायलं सुंदर रॅप, पाहा व्हिडीओ