पगार नाही दिला म्हणून कर्मचाऱ्यानी जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

मुंबई | गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे. या कोरोना काळात सरकारने सगळीकडे लॉकडाऊन जाहीर केलं होतं. त्या दरम्यान काही उद्योग धंदे आणि कंपन्या बंद पडल्या.

त्यामुळे त्यांमध्ये काम करणारे कर्मचारी बेरोजगार झाले. शिवाय ज्या कंपन्या सुरू होत्या, त्या ठिकाणच्या कर्मचारांना वेळेवर पगारही भेटल नसल्याचं आपण ऐकलं असेल.

आपल्याला माहित आहे की, कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतील असल्या की ते संप करतात. तसेच पगार वाढवून घ्यायचा असेल नाहीतर तो वेळेवर भेटत नसेल तरी काही कंपनीमधील कर्मचारी संप, मोर्चे काढतात.

परंतू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही वेगळंच चित्र पाहायला मिळतं आहे. चक्क एका कर्मचाऱ्याने पगार मिळाला नाही म्हणून, थेट जेसीबी आणत कंपनीत तोड-फोड करायला सुरूवात केली असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

कंपनीच्या बाहेर म्हणजेच ज्या ठिकाणी कंपनीच्या गाड्या पार्किंगला लावल्या जातात त्या ठिकाणी एक व्यक्ती जेसीबी घेऊन आला आहे. तो तेवढ्यावरच थांबला नसून, त्याने तो जेसीबी सुरू करत, त्या ठिकाणी असलेले मोठं-मोठे ट्रकची तोड-फोड करायला सुरूवात करतो.

हे पाहून त्या ठिकाणी असलेली कर्मचारी मंडळी त्याला आडवण्याचा प्रयत्न करतात. पंरतू तो कोणाचही ऐकून घेत नसल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच हा व्हिडीओ जवळजवळ 17 हजार लोकांनी पाहिला असून, त्यातील काहींनी या व्हिडीओला कमेंट देखील केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

चक्क एका अजगराने गिळलं जिवंत हरिण, पाहा व्हायरल व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! आता होणार चालता बोलता दाढी-मिशी, पाहा व्हायरल व्हिडीओ

शाइनिंग करत माकडासोबत फोटो काढायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ

दोन दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर

अंकिता लोखंडे बनली देवदासची पारो, डान्स पाहून चाहते घायाळ