राहुल गांधींच्या चाहत्याचं प्रेम अनावर; घेतलं चक्क चुंबन

वायनाड | काँग्रेस नेते राहुल गांधी पुरग्रस्तांना भेटण्यासाठी 4 दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. पुराचा सगळ्यात जास्त फटका त्यांचा मतदारसंघ असणाऱ्या वायनाडला बसला आहे. या भेटींदरम्यान त्यांना एका अनपेक्षित घटनेला सामोरं जावं लागलं. 

राहुल गांधी गाडीच्या पुढच्या सीटवर बसून तिथल्या नागरिकांशी संवाद साधत होते. तितक्यात एका चाहत्याने त्यांच्याशी हात मिळवला आणि पुढचं काही कळायच्या आतच त्याने त्यांचं चुंबन घेतलं. त्यानंतर राहुल गांधी काहीसे गोंधळले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

घडलेल्या प्रकारानंतर एकाने त्या चुंबन घेणाऱ्याला मागे ओढलं आणि त्यानंतर राहुल गांधी लोकांशी हात मिळवत संवाद साधत राहिले.

दरम्यान, राहुल गांधी यांच्याबाबतीत असा प्रकार काही पहिल्यांदा घडलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, 14 फेब्रुवारीला एका महिलेनं त्यांच्या गालाचं चुंबन घेतलं होतं. पश्चिम बंगालमध्येही एका पुरूषाने त्यांचं चुंबन घेतलं होत. 

ANI या वृत्त संस्थेचं ट्वीट-

#WATCH A man kisses Congress MP Rahul Gandhi during his visit to Wayanad in Kerala. pic.twitter.com/9WQxWQrjV8

— ANI (@ANI) August 28, 2019

महत्वाच्या बातम्या-