‘मंदिर पाडून मस्जिद बांधली नव्हती, आता मात्र मंदिर पाडून मस्जिद बांधली जाईल’; ‘या’ मु्स्लिम नेत्याने दिली धमकी!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं. राम मंदिराच्या उभारणीसाठी शेकडो कारसेवकांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र, आता ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी यांनी थेट राम मंदिर पाडण्याची धमकी दिली आहे.

बुधवारी पार पडलेल्या राम मंदिर भूमीपूजनानंतर रशीदी यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी राम मंदिराविषयी बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे रामभक्तांची मने दुखावली गेली आहेत.

इस्लामनुसार एखादी मस्जिद ही कायम मस्जिदच राहते त्या ठिकाणी तुम्ही दुसरे काहीही बांधू शकत नाही. आम्ही असं मानतो की तिथे मस्जिद होती व ती कायम राहील. ती मस्जिद मंदिर पाडून बांधलेली नव्हती. आता मात्र मंदिर पाडून मस्जिद बांधली जाईल, अशी धमकीच रशीद यांनी दिली आहे.

दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असुद्दीन ओवैसी यांनी राम मंदिरावरून मोदींवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी भूमिपूजन कार्यक्रमात मोदींच्या सहभागावर सवाल उपस्थित करत लोकशाहीचा पराभव झाल्याचं म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांंना कोरोनाची लागण

धक्कादायक! ‘सुशांतसिंह राजपूतचा गळा दाबून खून?’; सुशांतचे चाहते संतापले

‘या’ भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या; गेल्या 48 तासांत दुसरा हल्ला!

आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या; आत्महत्येच कारण अस्पष्ट !

हजारोंचं जीवन उद्धवस्त करणाऱ्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे सावट