देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत भेटायला आला ‘हा’ खास मित्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटण्यासाठी एक खास मित्र थेट संसदेत आला होता. या खास मित्रासोबतचे फोटो मोदींनी आपल्या सोशल अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. 

मोदींचा हा खास मित्र दुसरा तिसरा कुणी नसून भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सत्यनारायण जटिया यांचा नातू आहे. मोदींनी आपल्या इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर त्या चिमुकल्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. 

संसदेत आज मला भेटण्यासाठी खास मित्र आला, असं कॅप्शन देत मोदींनी त्याच्यासोबत काढलेले फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 

नरेंद्र मोदींच्या कुशीत असलेला चिमुकला नक्की कोण याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्यांदा काही लोकांना हा मुलगा गृहमंत्री अमित शहांचा नातू वाटला. 

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये नरेंद्र मोदी त्याच्यासोबत खेळत आहेत. मोदींनी त्याला चॉकलेट्सही दिल्याचं फोटोत दिसत आहे. 

कामातून वेळ काढून मोदींनी या चिमुकल्यासोबत काही वेळ घालवला. मोदींनी यापूर्वीही परदेश दौऱ्यावर असताना लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातही मोदी प्रोटोकॉल बाजूला ठेवून मुलांशी गप्पा मारताना पाहायला मिळतात. 

 

View this post on Instagram

 

A very special friend came to meet me in Parliament today.

A post shared by Narendra Modi (@narendramodi) on

महत्वाच्या बातम्या-

-त्या २ जागा द्या, नाहीतर नागपुरात मुख्यमंत्र्यांसह सर्व जागा पाडू; शिवसेनेचा इशारा

-“मोठं होण्यासाठी चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांवर टीका सुरु”

“मोदीजी तुमचं आणि ट्रम्पचं काय बोलणं झालं हे तुम्ही देशाला सांगावं”

-मला तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती- नुसरत जहाँ

-…म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे 25 टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात!

IMPIMP