धक्कादायक! आणखी एका बड्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृ.त्यू

मुंबई | मनोरंजन विश्वासाठी 2020 हे वर्ष अतिशय धक्कादायक ठरलं आहे. 2020 या वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. सुशांत सिंह राजपूत, ऋषी कपूर, इरफान खान अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांचा यावर्षी मृ.त्यू झाला आहे.

अनेक दिग्गजांना गमावल्यामुळे बॉलीवूड इंडस्ट्री अगोदरंच दुःखात असताना आता इंडस्ट्रीवर आणखी मोठं दुःख ओढवलं आहे. आणखी एका अभिनेत्रीच्या निध.नाची बातमी आता समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा देखील आज संशयास्पदरित्या मृ.त्यू झाला आहे.

आर्याचे संपूर्ण नाव देबदत्ता बॅनर्जी असे आहे. सितारवादक निखील बॅनर्जी यांची ती मुलगी आहे. आर्या कोलकत्त्याच्या जोधपूर भागात एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. आर्या एकटीच राहत होती. आर्याने तिची रूम आतमधून बंद केली होती. शेजारील अनेक लोकांनी आर्याला कॉल केले तिच्या रूमचा दरवाजा वाजवला तरी देखील आर्या दरवाजा उघडत नव्हती.

यामुळे अखेर शेजारील लोकांनी स्थानिक पोलिसांना याबद्दल खबर दिली. स्थानिक पोलीस तातडीने आर्याच्या अपार्टमेंटमध्ये दाखल झाले. पोलिसांनी आर्याच्या रूमचा दरवाजा तोडला तर पोलिसांना आतमध्ये तिचा मृ.तदेह आढळला.

तसेच पोलिसांना तिच्या रूममध्ये काही औषधे आणि दारूच्या बाटल्या देखील आढळल्या आहेत. पोलिसांनी आर्याचा मृ.तदेह श.वविच्छेदनासाठी पाठवला आहे. तूर्तास पोलिसांनी अनैसर्गिक मृ.त्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, आर्याने ‘डर्टी’ चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन बरोबर काम केलं आहे. तसेच तिने ‘लव्ह सेक्स अँड चीटिंग’ या चित्रपटात देखील काम केले आहे. अनेक कलाकारांनी आर्याच्या मृ.त्यूचे दुःख व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्या’ दिवशी शरद पवार खोटं बोलले आणि लाखो लोकांचा जीव वाचला!

तुम्हाला एकच मुलगी का?; शरद पवारांनी दिलं जबरदस्त उत्तर

“मी शपथ घेवून सांगतो हा माझा मुलगा नाही” – इमरान हाश्मी

पंकजा मुंडेंनी कसं घटवलं 14 किलो वजन?; सांगितल्या खास टिप्स (maharashtrakesari.in)

धक्कादायक! कोरोनाची लस घेतली अन् HIV इन्फेक्शन झालं? (maharashtrakesari.in)