धनंजय मुंडेंची लहान बहिणीला भावनिक साद, पंकजा मुंडेंचा काय प्रतिसाद?

बीड | राजकीय वर्तुळात सध्या अनेक महत्वाच्या गोष्टी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या खेळी सातत्यानं चालूच आहेत. मात्र, असं असलं तरी महाराष्ट्रातील राजकारणात एकमेकांच्या विरोधात काम करणाऱ्या अनेक नेत्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. यामुळे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून हे नेते नेहमी आपले संबंध जपताना दिसतात.

मुंडे कुटुंबातील भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे हे दोन्ही भाऊ बहिण राजकारणातील आपापल्या पक्षाची भूमिका नेहमीच उत्तमरित्या सांभाळताना दिसतात. राजकारणामुळे या भाऊ बहिणींमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद चालल्याचं दिसत आहे. मात्र, आज सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या लहान बहिणीला भावनिक साद घातली आहे.

आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम असतो. मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

आज गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर त्यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. यावेळी वृत्त माध्यमांशी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांना भावनिक साद घातली आहे.

राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि संबंध संबंधांच्या ठिकाणी आहेत. यापूर्वी राजकारणामध्ये कडवटपणा होता. तो कडवटपणा तसाच राहील. पण कुठेतरी आता घरात संवाद झाला पाहिजे या मताचा मी आहे, अशी साद धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना घातली आहे.

तसेच धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, ज्या व्यक्तीसोबत मी राजकारणाची सुरुवात केली. विद्यार्थी दशेपासून सावलीसारखा आप्पांच्या सोबत राहिलो. 5 वर्षांची सत्ता वगळता मुंडे साहेबांचा काळ विरोधात गेला.

कुठल्याही प्रश्नावर ते संघर्षाचा लढा उभा करायचे. कुठलाही प्रश्न ते संघर्षातून सोडवण्यासाठी पाठपुरावा करायचे. जेणेकरून सत्ताधाऱ्यांना तो प्रश्न सोडवण्याचा विचार करावाच लागायचा. आप्पांच्या अशा सर्व गोष्टींची आठवण आजही आम्हाला होते.

तसेच धनंजय मुंडे यांनी ट्वीटरवरून देखील गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं आहे. अप्पा…खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते. त्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व.अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं ट्वीट गोपीनाथ मुंडे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! आणखी एका बड्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृ.त्यू

‘त्या’ दिवशी शरद पवार खोटं बोलले आणि लाखो लोकांचा जीव वाचला!

तुम्हाला एकच मुलगी का?; शरद पवारांनी दिलं जबरदस्त उत्तर

“मी शपथ घेवून सांगतो हा माझा मुलगा नाही” – इमरान हाश्मी

पंकजा मुंडेंनी कसं घटवलं 14 किलो वजन?; सांगितल्या खास टिप्स (maharashtrakesari.in)