यूजीसीविरोधात आदित्य ठाकरेंनी थोपटले दंड! सुप्रीम कोर्टात घेतली धाव

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्य सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगानं सप्टेंबरपासून परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या विरोधात आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

यूजीसीने पत्राद्वारे राज्यातील सर्व विद्यापीठांना गाईडलाईन्स पाठवल्या आहेत. त्याबरोबरच, अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे निर्देश ही यूजीसीने दिले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यूजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्याची माहिती युवासेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी दिली आहे.

राज्य सरकारने आधीच अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याबरोबरच, कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, यूजीसी आणि राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांसमोर संभ्रम निर्माण होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी रियाबाबत नवा खुलासा; पोलिसांच्या हाती लागले ‘हे’ पुरावे

विजय मल्ल्याची सर्वोच्च न्यायालयात धाव; 13 हजार कोटी परतफेड करण्याची तयारी!

बापाचं संतापजनक कृत्य; बाळंतीण लेकीनं उचललं हे धक्कादायक पाऊल

महाविकास आघाडीतल्या ‘त्या’ वाद शिवसेनेकडून दिलगीरी; बाळासाहेबांचं स्पष्टीकरण

सख्या भावांनी घरातील सात जणांची तलवारीने केली निर्घृण हत्या; संपुर्ण जिल्हा हादरला!