धारावी पॅटर्न ज्यानं यशस्वी करुन दाखवला ‘तो’ अधिकारी आता पुण्याला कोरोनामुक्त करणार!

पुणे | काही दिवसांपूर्वी मुंबईतील धारावी हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात होते. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात तेथील प्रशासनाला यश मिळालं आहे. धारावीमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडूनही कौतुक करण्यात आलं होतं. मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या गेल्या, त्याच उपाययोजना आता पुण्यात राबवण्यात येणार आहेत.

पुण्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांची मदत घेतली जाणार आहे. मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा धारावी पॅटर्न आता पुण्यात पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यासंबंधीत आढावा बैठक घेतली.

मुंबईच्या धर्तीवर तातडीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णालयांची उभारणी करण्याचे आदेश अजित पवार यांनी यावेळी दिले आहेत.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सौरभ राव, एस. चोक्कलिंगम, विक्रम कुमार, श्रावण हर्डीकर या अधिकाऱ्यांसह ही बैठक झाली. पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पाचारण करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

महत्त्वाच्या बातम्या-

तुम्हा सर्वांचे खूप आभार मानायचे आहेत पण… अमिताभ बच्चन झाले भावुक!

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी रियाबाबत नवा खुलासा; पोलिसांच्या हाती लागले ‘हे’ पुरावे

विजय मल्ल्याची सर्वोच्च न्यायालयात धाव; 13 हजार कोटी परतफेड करण्याची तयारी!

बापाचं संतापजनक कृत्य; बाळंतीण लेकीनं उचललं हे धक्कादायक पाऊल

महाविकास आघाडीतल्या ‘त्या’ वाद शिवसेनेकडून दिलगीरी; बाळासाहेबांचं स्पष्टीकरण