“आले रे आले मराठे आले…”; बहुप्रतिक्षित ‘पावनखिंड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

मुंबई । प्रसिध्द दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या पावनखिंड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. याआधी लांजेकर यांचे फर्जद आणि फत्तेशिकस्त यासारखे प्रसिध्द चित्रपट आपल्याला पहायला मिळाले आहेत.

पावनखिंड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाल्यानंतर आता सर्वचजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

दिग्पाल लांजेकर यांनी स्वत: आपल्या सोशल मीडियावर पोस्टर शेअर केला. त्याचबरोबर पावनखिंडचा ट्रेलर देखील शेअर केला आहे. इतिहासातील अंगावर काटा आणणाऱ्या लढाईची झलक पावनखिंडच्या ट्रेलरमधून पहायला मिळाली आहे.

पावनखिंड या चित्रपटांची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. पावनखिंड चित्रपट 21 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना महामारीमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता.

पावनखिंड या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर दिसणार आहे. तर आऊसाहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी आपल्याला दिसणार आहे.

पावनखिंडमध्ये प्राजक्ता माळी, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, शिवराज वायचळ हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

पावनखिंड हा चित्रपट येत्या 18 फेब्रुवारीला आपल्याला चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

पावनखिंडचे दिग्दर्शन आणि लेखन दिग्पाल लांजेकर यांनीच केलं आहे. तर अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दरम्यान, घोरखिंडीत झालेल्या या लढाईत मराठ्यांनी सिद्दी जोहरचा दारूण पराभव केला होता. तिच चित्रकथा आणि रक्तरंजित युध्दाचा थरार या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

पाहा ट्रेलर-

महत्त्वाच्या बातम्या – 

ओवेसींनी पाकड्यांना सुनावलं म्हणाले, “हा देश माझा आहे, तुमच्या…”

 “हा पुरूषार्थ आहे का?”; हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

 मनसेचं ठरलंय! “आम्ही किंग मेकर नाही तर किंग बनणार”

“कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण…”; भारतीयांना अत्यंत धक्कादायक इशारा जारी

कर्नाटक हिजाब प्रकरणावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…