‘हा आमच्या घरचा प्रश्न आहे’; ओवैसींनी पाकड्यांना सुनावलं

नवी दिल्ली | कर्नाटकमधील उडपी येथील एका महाविद्यालयात घडलेल्या हिजाब प्रकरणानं देशासह आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चांना उधाण आलं आहे. परिणामी हा वाद लवकर मिटवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करत आहे.

मुस्लीम मुलींना महाविद्यालयात हिजाब परिधान करून येण्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. सध्या सर्वत्र हिजाब हा एकच विषय चर्चेत आहे.

हिजाब प्रकरणावरून कर्नाटकमध्ये ठिकठिकाणी हिंदू-मुस्लीम वाद निर्माण झाल्याची परिस्थिती दिसत होती. त्यानंतर आता पाकिस्ताननं या विषयावर भाष्य केल्यानं नवं वळण मिळालं आहे.

भारतात मुस्लिमांवर अन्याय होत आहेत असं पाकिस्तानकडून बोललं गेल्यानंतर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलं आहे.

पाकिस्ताननं भारताच्या कोणत्याही मुद्द्यात पाय घालण्याचा प्रयत्न करू नये. मलालावर झालेला हल्ला पाकिस्तानात झाल्याची आठवण ओवेसी यांनी पाकिस्तानला करून दिली आहे.

पाकिस्तानच्या घटनेनुसार तेथे कोणताही बिगर मुस्लीम पंतप्रधान होऊ शकत नाही. आम्ही पाकिस्तानला सांगू की तुम्ही इकडे पाहू नका, तिकडे बघा. तुमच्यात काय मारामारी आहे ते पहा, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला आहे.

हा देश माझा आहे, तुमचा नाही. हा आमच्या घरचा प्रश्न आहे. त्यात तुमचे पाय आणि नाक घालू नका अन्यथा तुमच्या पायाला आणि नाकाला दुखापत होईल, असंही ओवेसी म्हणाले आहेत.

दरम्यान, देशात हिजाब प्रकरणावरून नव्या भांडणाला सुरूवात झाली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनानं महाविद्यालयं बंद होती आता सुरू झाल्यावर लगेच हा वाद पेटल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “हा पुरूषार्थ आहे का?”; हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

 मनसेचं ठरलंय! “आम्ही किंग मेकर नाही तर किंग बनणार”

“कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण…”; भारतीयांना अत्यंत धक्कादायक इशारा जारी

कर्नाटक हिजाब प्रकरणावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या… 

रानू मंडल पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात, यावेळी केलं ‘हे’ मजेशीर काम