‘पहला नशा’…आमिर खान आणि नीता अंबानीचा तो डान्स व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Aamir Khan dance with Nita Ambani l अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटच्या (Radhika Merchant) प्री-वेडिंग कार्यक्रमाचा तिसरा आणि शेवटचा दिवस खूपच खास होता. तिसऱ्या दिवशी अरजित सिंग, लकी अली, श्रेया घोषाल आणि उदित नारायण या गायकांनी कार्यक्रमाला शोभा आणली. या सर्व गायकांनी आपल्या सुमधुर गाण्यांनी पाहुण्यांचे मनोरंजन करून मंत्रमुग्ध केले. हे सर्व गायक गाणी म्हणत असताना अनेक बॉलिवूड स्टार्स आणि इतर पाहुणे खाली डान्सची मजा घेत होते.

प्री-वेडिंगच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि नीता अंबानी यांच्या डान्सचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये आमिर खान नीता अंबानीसोबत त्याच्याच चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Aamir Khan dance with Nita Ambani l आमिर खानने नीता अंबानीसोबत डान्स केला

व्हायरल क्लिपमध्ये दिसत आहे की, उदित नारायण स्टेजवर आमिर खानच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील ‘पहेला नशा’ गाणे गाताना दिसत आहे. त्याचवेळी स्टेजच्या खाली आमिर खान नीता अंबानीसोबत या गाण्यावर डान्स करत आहे. त्याच्यासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटही या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहते त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.

https://www.instagram.com/p/C4EXbgIoPl9/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again 

Aamir Khan dance with Nita Ambani l प्री-वेडिंग सोहळ्याला मोठ्या दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली :

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन शुक्रवार, 1 मार्चपासून सुरू झाले तर 3 मार्चला संपले आहे. गुजरातमधील जामनगर येथे तीन दिवसीय हा भव्य कार्यक्रम पार पडला आहे. ज्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दिग्गज उद्योगपती, राजकारणी, खेळाडू व कलाकार उपस्थित होते.

News Title : Aamir Khan dance with Nita Ambani

महत्त्वाच्या बातम्या-

सैनिकांसाठी आनंदाची बातमी! Honda Elevate कार आर्मी कॅन्टीनमध्ये उपलब्ध असणार

रोहित शर्मा वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूचा विक्रम तोडण्यास सज्ज; नशीब साथ देईल का?

गुड न्यूज! आता WhatsApp वरून Telegram वर देखील मेसेज येणार

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

लवकरच पैसे कमावण्याची सुवर्णसंधी! देशातील सर्वात मोठा IPO येणार