सैनिकांसाठी आनंदाची बातमी! Honda Elevate कार आर्मी कॅन्टीनमध्ये उपलब्ध असणार

Honda Elevate Now Available At CSD Stores l Honda Cars India ची नवीनच SUV – Elevate आता Canteen Store Department (CSD) वर देखील उपलब्ध असणार आहे. Honda Cars India ने घोषणा केली आहे की भारतीय लष्कराचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय नवीन Elevate mid-size SUV देशभरातील Canteen Store Department (CSD) मधून खरेदी करू शकतात. केवळ एलिव्हेटच नाही तर कॅन्टीन स्टोअर विभागात होंडा सिटी आणि अमेझ कॉम्पॅक्ट सेडान देखील उपलब्ध असणार आहेत.

Honda Elevate Now Available At CSD Stores l इंजिन आणि ट्रान्समिशन बद्दलची माहिती :

Honda Elevate मध्यम आकाराच्या SUV मध्ये 1.5-लिटर 4-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 121PS पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करते. तसेच यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील आहे.

Honda Elevate कारची लांबी 4312mm असणार आहे तर रुंदी 1790mm आणि उंची 1650mm आहे. तसेच त्याचा व्हीलबेस 2650mm आहे. SUV चा ग्राउंड क्लीयरन्स 220mm आहे, जो या सेगमेंटमध्ये सर्वाधिक आहे. Honda Elevate कार ही SV, V, VX आणि ZX या चार वेगवेगळ्या ट्रिममध्ये येणार आहेत.

Honda Elevate ची इतर वैशिष्ट्ये :

Honda Elevate च्या टॉप मॉडेलमध्ये अनेक चांगले फीचर्स आहेत. यामध्ये ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) आहे, ज्यामध्ये ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Honda Elevate कारमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, लेदरेट अपहोल्स्ट्री, 8-स्पीकर साउंड सिस्टम, ऑटो-डिमिंग IRVM आणि क्रोम डोअर हँडल्स असणार आहेत.

Honda Elevate Now Available At CSD Stores l कुणाल बहल यांनी दिली माहिती :

होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष (मार्केटिंग आणि सेल्स) कुणाल बहल यांनी माहिती दिली की, “आमच्या सैनिकांसाठी होंडा एलिव्हेटची उपलब्धता वाढवणे हा आमच्यासाठी विशेषाधिकार आहे. या उपक्रमामुळे आमच्या देशाची सेवा करणाऱ्यांना उच्च दर्जाची होंडा उत्पादने उपलब्ध होतील. “त्यांना पाठिंबा देण्याची आमची बांधिलकी बळकट करते.”

News Title  : Honda Elevate Now Available At CSD Stores

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्मा वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूचा विक्रम तोडण्यास सज्ज; नशीब साथ देईल का?

गुड न्यूज! आता WhatsApp वरून Telegram वर देखील मेसेज येणार

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

लवकरच पैसे कमावण्याची सुवर्णसंधी! देशातील सर्वात मोठा IPO येणार

तुमचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थाचा समावेश करा