औरंगाबाद | नितीन गडकरीच सेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतील. दोन व्यक्तींची मनं जुळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, असं वक्तव्य महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
नितीन गडकरीच सेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतील. दोन व्यक्तींची मनं जुळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. युतीचा अधिकार माझ्या हातात नाही, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असं अब्दुल सत्तार म्हणालेत. ते सिल्लोडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
नितीन गडकरी हा माणूस मागील 30 वर्षांपासून मातोश्रीवर जात आहे. त्यामुळे मी हे वक्तव्य केलं, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे.
दोन रस्त्यांवर ते पूल बांधू शकतात तर दोन व्यक्तींची मनही जुळवू शकतात. त्यामुळे मी हे वक्तव्य केलं. मी कालही तेच विधान केलं आणि आजही करतोय, असं ते म्हणाले.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी युतीसंदर्भात याआधी देखील वक्तव्य केलं होतं. तसेच दुसऱ्याच दिवशी त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे युतीच्या चर्चांना आणखी उधाण आलं होतं.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अब्दुल सत्तारांची चांगलीच कानउघडणी केली होती. अब्दुल सत्तारांना शिवसेनेत येऊन किती दिवस झाले?, असा सवाल त्यांनी केलेला.
अब्दुल सत्तार यांची अजून हळद आणखी उतरायची आहे, अशा तिखट शब्दात संजय राऊत यांनी त्यांची कानउघडणी केली होती. आता पुन्हा एकदा सत्तार यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
न्यायालयाचा नितेश राणेंना मोठा झटका, मारहाण प्रकरणी दिला हा निर्णय
‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत’; राऊतांनी भाजप नेत्यांना झापलं
“…तर राज्य सरकार चालवायची जबाबदारीही केंद्राकडेच द्या”
‘माझ्या ब्रा ची साईज देव…’; अभिनेत्री श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्य
‘आज काळीज फाटलं’; आमदार विजय रहांगडालेंची लेकासाठी भावूक पोस्ट