“उदयनराजेंविरोधात लढलो मग पवारांना तरी का सोडू???”

पुणे |  बिग बॉस माराठी-2 पासून प्रसिद्ध झालेल्या अभिजीत बिचुकले  यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे.  इतकंच नाही तर साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत शरद पवार  उभे राहिले, तर त्यांना आव्हान देणार असल्याचं अभिजीत बिचुकले म्हणाले.

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढणार आणि जर शरद पवारसाहेब उभे राहिले तरी 100 टक्के लढणार, असं वक्तव्य अभिजीत बिचुकले यांनी केलंय.

विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील 288 पैकी 288 जागा लढवणार असल्याचं अभिजीत बिचुकले यांनी सांगितलं. =

बिचुकले यांनी स्वत:चा वेगळा पक्षही स्थापन केला. ‘अखिल बहुजन समाज सेना’ असं बिचुकलेंच्या पक्षातं नाव आहे.

दरम्यान, उदयनराजे शिवरायांच्या घराण्यात जन्माला आलेत, तरी त्यांच्यासमोर लोकशाही पद्धतीने लढलो. तर मग शरद पवारांना का सोडू?,  असं बिचुकले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-