“राष्ट्रपती निवडणुकीसाठी मी काही डावपेच रचलेत, माझा अर्ज 100 टक्के जाणार”

मुंबई | ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आलेत आहेत. अभिजित बिचुकले यांनी यापूर्वी राष्ट्रपतीपद, खासदार आणि आमदारकी अशा सर्वप्रकारच्या निवडणुका लढवून झाल्या आहेत. आता अभिजीत बिचुकले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नशीब आजमवायचे ठरवलं आहे.

राष्ट्रपतींनी बऱ्याच गोष्टी देशासाठी करायच्या आहेत. पण त्या करत नाहीत, म्हणून मी देशातील आमदार, खासदार यांच्याशी बोलत आहे, असं त्यांनी सांगितलं.

सांगली, कोल्हापूर, पुण्यातील खासदारांशी चर्चा सुरू आहे. अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली, तर माझा अर्ज 100 टक्के जाणार, असं ते म्हणालेत.

दरम्यान, मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही आमदारांशी खासदारांशी सह्या देण्यासंदर्भात बोलत आहे. मी बहुजन समाजातील आहे, अतिशय निर्व्यसनी, सुशिक्षित आणि कायद्याची माहिती आहे हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं होतं. परंतु त्यावेळी त्यांनी कोणीतरी कोविंदसाहेब शोधून आणले आणि त्यांना देशाचं राष्ट्रपतीपद दिलं. त्यांना बहुमतामुळे ते जमलं, असं अभिजीत बिचुकले यांनी सांगितलं.

माझा असा एक डावपेच सुरू आहे, आपल्या न्यायपालिका असतील, केंद्रातील निर्णय असतील, या सगळ्या यंत्रणा राष्ट्रपतीपदाच्या दबावाखाली असतात. म्हणून त्या पदावरून योग्य निर्णय घेऊ शकत नाही, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“शरद पवारांशिवाय तगडा उमेदवार देशात उरलाय का?” 

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी! 

सर्वात मोठी बातमी; वाढत्या विरोधानंतर अग्निपथ योजनेत सरकारने केला मोठा बदल 

मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; ‘त्या’ चिठ्ठीने पुण्यात खळबळ 

“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवार तर…”