“माझ्यासमोर पंतप्रधानही आले तरी मी माझी बोलायची भाषा बदलणार नाही”

मुंबई | छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणजे बिग बाॅस. बिग बाॅस हा शो खूप लोकप्रिय असून नेहमीच सोशल मीडियावर त्याची चर्चा पहायला मिळते.

बिग बॉसच्या प्रत्येक सीझनवर भरपूर चर्चा होत असते. अनेक वाद-विवाद, टीका-टीपणी, रोमान्स, मैत्री अशा सगळ्या इमोशन्सनं भरलेला हा शो नेहमीच चांगला चर्चेचा विषय ठरत असतो.

सध्या सुरु असलेल्या बिग बाॅस 15 मध्ये काही दिवसांपूर्वी अभिजीत बिचुकलेची वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली होती. त्यानंतर अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय बनत आहे.

अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यानं पंतप्रधान मोदींवर केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे.

सध्या बिग बाॅसमध्ये तिकीट टू फिनालेचा खेळ चांगलाच रंगला आहे. यामध्ये अभिजीत फिनालेच्या तिकीटसाठी का पात्र नाही हे शमिता सांगत होती. मात्र शमितला प्रत्युत्तर देत अभिजीत म्हणाला की, ‘माझ्यासमोर पंतप्रधानही आले तरी मी माझी बोलायची भाषा बदलणार नाही.’

तिकीट टू फिनालेच्या या खेळात अभिजीतच्या या वक्तव्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. त्याच्या या वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ कलर्स टीव्हीच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच गराळा घालताना दिसत आहे.

दरम्यान, या सीझनमध्ये अभिजित बिचकुले आणि देवोलिना यांच्यातील केमेस्ट्री सगळ्यांनाच सभ्रमात टाकत असते. कधी खूप प्रेमानं वागतात तर कधी कडाक्याचं भांडण करतात. आता या सीझनचा वीनर कोण होणार याकडे सगळ्याचंच लक्ष लागून आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

महत्त्वाच्या बातम्या – 

  Corona: ‘या’ भागात कोरोनाचं थैमान; एकाच दिवशी दुप्पट रुग्णसंख्येची नोंद

  मोठी बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 64 व्या ग्रॅमी अ‍वॉर्डला स्थगिती

  सावधान! बुस्टर डोस देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक

  काय सांगता! खाण्या-पिण्याची आणि झोपण्याचीही डिग्री देते ‘ही’ युनिवर्सिटी, वाचा सविस्तर

Omicron ला रोखण्यासाठी ‘हे’ औषध प्रभावशाली; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी