धक्कादायक! टास्क जिंकण्यासाठी बिग बॉसच्या ‘या’ स्पर्धकाने ओलांडल्या सर्व सीमा

मुंबई | बिग बॉस हा रियालिटी शो जितका वादग्रस्त आहे तितकाच लोकप्रिय देखील आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्यांची भांडणं, वेगवेगळे टास्क आणि सोबत मनोरंजक ट्विस्ट यामुळे बिग बॉस शो प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरतो.

बिग बॉसचं सध्या 14 वं सिझन सुरू आहे. बिग बॉसचं हे सिझनही शेवटच्या टप्प्यात आलं आहे. सध्या सुरू असलेल्या ‘तिकीट टू फिनाले’ टास्कमध्ये स्पर्धकांचं वेगळं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

बिग बॉसच्या आधीच्या सिझनमध्ये अनेक स्पर्धक टास्क जिंकण्यासाठी सीमा ओलांडताना दिसले. टास्क जिंकण्यासाठी स्पर्धक कधीतरी असं काम करतात जे आपण रोजच्या आयुष्यात करताना दहादा विचार करतो.

बिग बॉसच्या तिकीट टू फिनाले टास्कमध्ये देवोलीना भट्टाचार्यने असंच काहीसं केलं आहे. टास्क जिंकण्यासाठीच्या देवोलिनाच्या चिकाटीला चाहत्यांनी सलाम केला आहे.

टास्कमध्ये देवोलिना विरूद्ध रश्मी देसाई अशी स्पर्धा रंगली होती. देवोलिना या टास्कमध्ये हारली पण तिची ताकद आणि टास्क जिंकण्याच्या तिच्या जिद्दीने प्रेक्षकांना चांगलच इंप्रेस केलं आहे.

तिकीट टू फिनाले जिंकण्यासाठी देवोलिना अगदी सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट करण्यापासूनही मागे राहिली नाही. देवोलिनाच्या टास्क जिंकण्याच्या जिद्दीला प्रेक्षकांनी सलाम केला आहे.

देवोलिनाच्या आधी मागच्या सिझनमध्ये राखी सावंत, प्रियंका जग्गा, प्रिया मलिक, पुनीश शर्मा हे स्पर्धकही टास्क जिंकण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट करण्यापासून परावृत्त झाले नव्हते.

दरम्यान, बिग बॉसचं सिझन आता रंजक वळणावर आलं आहे. फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सिझनमध्ये कोणता स्पर्धक बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 64 व्या ग्रॅमी अ‍वॉर्डला स्थगिती

पतीला झोपेत सेक्स करण्याचा भयंकर आजार, महिला म्हणते..

सावधान! बुस्टर डोस देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक

काय सांगता! खाण्या-पिण्याची आणि झोपण्याचीही डिग्री देते ‘ही’ युनिवर्सिटी, वाचा सविस्तर

पुण्यात तिसरी लाट येणार?; कोरोनाच्या रुग्णसंख्येत ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद