सुशांत प्रकरणी चालू झालेल्या ‘त्या’ वादावर अखेर अभिषेकनं मौन सोडलं म्हणाला…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला जणू ग्रहणच लागलं आहे. सुशांत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणानंतर बॉलिवूड इंडस्ट्री मधील नेपोटीजमचा वाद देखील चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूड मधील अनेक कलाकारांना नेपोटीजमच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं.

अनेक स्टार किड्सना या मुद्द्यावरून लक्ष केलं गेलं. अनेक सलेब्रिटींनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन हा नेपोटीजमच्या मुद्द्यावर आत्तापर्यंत शांत होता. मात्र, अभिषेकने आता या मुद्द्यावर मौन सोडलं आहे. नेपोटीजमच्या मुद्द्यावर अभिषेक बच्चन याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेकने एका मुलखाती दरम्यान नेपोटीजमच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

नेपोटीजमबाबत सध्या प्रत्येक स्तरावर चर्चा होत आहे. मात्र, हे खरं आहे की माझ्या वडिलांनी आत्तापर्यंत केव्हाच कोणाकडे माझ्यासाठी काम मागितलं नाही. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कोणतीही फिल्म देखील बनवली नाही. मीच त्यांच्यासाठी एक फिल्म प्रोड्युस केली ती म्हणजे ‘पा’, असं अभिषेक बच्चनने मुलाखती दरम्यान म्हटलं आहे.

बॉलिवूड मधील हा एक व्यवसाय आहे हे लोकांना समजायला हवं. पहिली फिल्म आल्यानंतर जर त्या फिल्ममधील तुमचा अभिनय लोकांना आवडला तर तुम्हाला काम मिळेल. नाहीतर तुम्हाला काम मिळणार नाही, असंही अभिषेक बच्चनने म्हटलं आहे.

तसेच तुम्हाला जर लोकांना तुमचं टॅलेंट दाखवायचं असेल तर तुम्हाला चांगलं काम करावं लागतं. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखील असंच आहे आणि हेच जिवनातील कटू सत्य आहे, असंही अभिषेक बच्चन याने यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, अभिषेक बच्चन याने 2000 साली बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. ‘रिफ्युजी’ हा अभिषेक बच्चनचा पहिला चित्रपट आहे. अभिषेकने त्याच्या आयुष्यात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यातील काही चित्रपट हिट झाले तर काही चित्रपट फ्लॉप ठरले.

अमिताभ बच्चन यांनी अभिषेकला अभिनय क्षेत्रात नेहमीच प्रेरित केलं. मात्र, केव्हाच अभिषेकच्या कामासाठी त्यांनी कोणाला फोन केला नाही किंवा कोणत्याही फिल्मला फायनान्स केलं नाही.

नेपोटीजमच्या मुद्द्यावरून सोनाक्षी सिन्हा, अलिया भट्ट, अनन्या पांडे यांसारख्या सलेब्रिटींवर सोशल मीडियावरून टीका करण्यात आली. अनेक स्टार किड्सनं ट्रोलर्सला सोशल मीडियावरून सडेतोड उत्तर दिली. तर काहींनी ट्रोलर्सला कंटाळून सोशल मीडिया आकाऊंटस बंद केली.

महत्त्वाच्या बातम्या-

जॅकलीन फर्नांडीसचा मोठा खुलासा! म्हणाली सलमानने फार्म हाऊसवर माझ्या सोबत…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आणखी एका व्यक्तीला एनसीबीनं रंगेहात पकडलं

‘त्या’ प्रकरणावरून भाजप नेते आक्रमक! आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंसह कॉंग्रेसवर केला घणाघात

‘ही’ प्रसिध्द अभिनेत्री गोव्यातील बीचवर विवस्त्र दिसली! पोलिसांनी टाकलं गजाआड

अर्णव गोस्वामींच्या अडचणीत वाढ! आता ‘या’ प्रकरणी अर्णव यांच्या विरोधात दुसरा गु.न्हा दाखल होणार?