वारंवार थुंकून चाटणे योग्य नाही; ‘या’ नेत्याचा राज ठाकरेंना कडवट सल्ला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जवळीक वाढत असल्याचं दिसत आहे. अशातच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी राज ठाकरे यांना कडवट सल्ला दिला आहे.

वारंवार थुंकून चाटणे योग्य नाही, राज ठाकरे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य आहात, किमान त्यांच्याकडे तरी पाहून असं वागू नका. राज यांनी भाजपसमोर गुडघे टेकू नये, असा सल्ला आझमी यांनी दिला आहे.

शिवसेनेची होत असलेली वाटचाल आणि त्यांचा झालेला मुख्यमंत्री यामुळे मनसे भाजपसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपवर अश्लाघ्य टीका करणाऱ्यांनी पुन्हा त्यांच्याच सोबत जावू नये, अशी आझमी म्हणाले आहेत.

मनसे-भाजपमधील जवळीक वाढत असल्याने यांची युती होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अबू आझमी यांच्या टीकेला मनसेकडून काय प्रत्युत्तर येईल हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-