बंडखोर आमदारांना सोबत घेत मुख्यमंत्री मुंबईसाठी रवाना, राजकीय हालचालींना वेग

मुंबई | एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत मोठी बंडाळी केली. या बंडखोरी नंतर महाराष्ट्रात 10 दिवस सत्तासंघर्ष पाहायला मिळाला.

10 दिवसांच्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यापालांनी शिंदे सरकारला बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

गोव्यात मुक्कामाला असलेले बंडखोर आमदार बहुमत चाचणीपूर्वी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गोव्याहून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत.

तब्बल 11 दिवसानंतर आमदार मुंबईत परतत आहेत. तर मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलपर्यंत कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 50 आमदारांसाठी विशेष कॉरिडोअर करण्यात आला आहे. तसेच गोव्याहून मुंबईत येण्यासाठी बंडखोर आमदारांसाठी विशेष विमानाची देखील सोय करण्यात आली आहे.

दरम्यान, आगामी विधासभा अध्यक्षपदाची निवडणूक व बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे बहुमत चाचणीत शिंदे सरकार पास होणार का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा छगन भुजबळांना झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“फडणवीसांच्या नावामागे ‘उप’ शब्द लावायला फार जड जातं”

संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शरद पवारांना दुसरा झटका